शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांचे उपचार आणखी महागण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:47 IST

नूतनीकरण शुल्कात होणार वाढ, प्रस्ताव विचाराधीन

ठाणे: ठाणे  महापालिकेने शहरातील खासगी आणि एक दिवसीय काळजी केंद्रांच्या नूतनीकरण शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर १८ फेब्रुवारीच्या महासभेत चर्चा होणार आहे. त्यानुसार या नूतनीकरण शुल्कामध्ये २५० रुपयांपासून १ लाखापर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यापूर्वी १५० पेक्षा जास्त बेडच्या रुग्णालयांना १० लाख रुपये शुल्क होते. नव्या प्रस्तावात अशा रुग्णालयांसाठी १२ लाख ५० हजार ते ४० लाखांपर्यंतचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या भरमसाठ शुल्कवाढीमुळे अगोदरच खर्चिक असलेले खासगी रुग्णालयांतील उपचार आणखी महागण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत मार्चपासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयासोबतच शहरातील काही खासगी रुग्णालयातही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मधल्या काळात काही खासगी रुग्णालयांनी अवाजवी बिले वसूल केल्याची काही उदाहरणे  पुढे आली होती. यामुळे रुग्णांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला होता. त्यात आता शहरातील खासगी रुग्णालये आणि एक दिवसीय काळजी केंद्राच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरण शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांसाठी हे शुल्क निश्चित करण्यात आले असून त्याचा फटका संबंधित रुग्णालय व्यवस्थापनांसह सर्वसामान्य ठाणेकरांनाही सहन करावा लागणार आहे. दरम्यान, नव्या प्रस्तावानुसार शहरातील १ ते १५० बेडच्या खासगी रुग्णालयांच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरण शुल्कामध्ये २५० ते १ लाखापर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. यापूर्वी १५१ पेक्षा जास्त बेड असतील तर दहा लाख रुपये शुल्क होते. मात्र, नव्या प्रस्तावात अशा रुग्णालयांसाठी १२ लाख ५० हजार ते ४० लाखापर्यंतचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी हे दर असणार आहेत.