शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात स्वखर्चातून साकारली खासगी वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:37 IST

निसर्गाने नटलेल्या कोंडेश्वर आणि भोज धरणाच्या डोंगरावरील वनसंपदा नष्ट झाली होती.

पंकज पाटील अंबरनाथ : निसर्गाने नटलेल्या कोंडेश्वर आणि भोज धरणाच्या डोंगरावरील वनसंपदा नष्ट झाली होती. एकेकाळी दाट वनराई असलेल्या या परिसराला पुन्हा हिरवेगार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ही मोहीम शासकीय यंत्रणेने नव्हे तर, बदलापुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने राबवली आहे. भोज धरणाच्या काठावर असलेल्या ५ एकर जागेपैकी तीन एकरावर पाच वर्षांपूर्वी वृक्षारोपण करुन ती झाडे जगवण्याचे काम या कार्यकर्त्याने केले आहे. त्यामुळे हा परिसराला पुन्हा घनदाट वनराईने नटला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत, परिसरातील ग्रामस्थदेखील वनराई जोपासण्यासाठी पुढाकार घेत आहेत.बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते आशीष गोळे यांनी बदलापूर शहरात गोळे फाऊंडेशनच्या नावाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांनी आता बदलापूर आणि परिसरात वनसंपदा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपन करून ते वृक्ष तसेच सोडून दिले जातात. त्या वृक्षांपैकी किती वृक्ष जगली, याची कधीच माहितीदेखील घेतली जात नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेसाठी वृक्षारोपण हे केवळ आकडेवारी वाढवण्याच्या कामाचे झाले आहे. विकास कामांसाठी वृक्षांची कत्तल होत असताना संबंधितांना नवीन वृक्ष लागवड करण्याची सक्ती केली जाते. मात्र त्यातील किती वृक्ष जगली, याची आकडेवारी कधीच पुढे येत नाही. त्यामुळे बदलापूर आणि परिसरातील वृक्षसंपदेला धोका निर्माण झाला आहे.एकीकडे शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असताना गोळे यांनी पुढाकार घेत स्वबळावर वनसंपदा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:ची जागा वापरली आहे.व्यावसायिक दृष्टीकोण बाजूला सारुन त्यांनी पाच वर्षांपूर्वी भोज धरणाच्या काठावर असलेल्या आपल्या ५ एकर जागेपैकी तीन एकरावर वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेतली. कोणाचीही मदत न घेता त्यांनी स्वखर्चाने वृक्ष लागवड केली. वृक्ष संवर्धन करण्यासाठी कायमस्वरुपी दोन कामगारदेखील ठेवले. त्या कामगारांच्या माध्यमातून ३ एकरमधील वनसंपदा जोपासण्याचे काम करण्यात आले. त्यांच्या या प्रयत्नांना पाच वर्षांनंतर यश आले आहे. ओसाड झालेले डोंगरमाळ आता हिरवाईने फुलले आहे. भोज धरणाच्या किनाऱ्यावर लांबच लांब पट्टा हा दाट जंगल स्वरुपात तयार झाला आहे.गोळे यांनी पाच वर्षांपूर्वी जो उपक्रम हाती घेतला होता, त्या उपक्रमाला आज गती मिळाली आहे. ३ एकर जंगलासोबत त्यात वाढ करण्याची मोहीम ते हाती घेणार आहेत. कोंडेश्वर आणि परिसरात जगेचे भाव वाढलेले असतानाही त्यांनी जागेचा व्यावसायिक वापर न करता त्या जागेवर जंगलनिर्मितीचे काम हाती घेतले आहे.गोळे यांच्या या प्रयत्नांमुळे आता परिसरात ग्रामस्थदेखील वनसंपदा सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. एकेकाळी दाट वृक्ष असलेल्या या परिसरात नव्याने वृक्ष लागवडीची गरज आहे. गोळेंसारख्या सर्वच व्यक्ती खाजगी जंगल उभारण्यासाठी पुढाकार घेणार नाहीत, हे वास्तव आहे. मात्र शासनाने गोळे यांच्या उपक्रमातून काही बोध घेतला तरी, हा परिसर पुन्हा वनराईच्या स्वरुपात पुढे येईल.>भोज धरणाजवळ केलेले काम मला बदलापूर शहरात करण्याची इच्छा होती. शहरात अनेक ठिकाणी एकर, दोन एकर जागेत जंगल निर्माण करुन त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. शहरात करणे शक्य न झाल्याने ग्रामिण भागात केले आहे. आता त्याचे अनुकरण झाले तरी आपल्याला समाधान मिळेल. - आशीष गोळे