शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

खासगी बसचे चोरी चोरी चुपके...

By admin | Updated: May 11, 2017 01:59 IST

कोपरी ते घोडबंदर मार्गावर बेकायदा बसच्या विरोधात येथील रहिवाशांनी एल्गार पुकारल्यानंतर त्या काही दिवस बंद होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोपरी ते घोडबंदर मार्गावर बेकायदा बसच्या विरोधात येथील रहिवाशांनी एल्गार पुकारल्यानंतर त्या काही दिवस बंद होत्या. परंतु, आता त्या पुन्हा एकदा सुरू झाल्या असून त्यांनी आता आपला शेवटचा थांबा बदलला आहे. या बस आता कोपरी पूर्वेला जात नसून त्या तीनहातनाक्यावरून चोरी चोरी चुपके चुपके प्रवास करून गावदेवीजवळ येऊन थांबत आहेत. त्यामुळे या भागात चक्काजाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मागील कित्येक वर्षांपासून ठाणे ते कोपरी अशी बेकायदा प्रायव्हेट बसची सेवा सुरू आहे. या बसवर कित्येक वेळा कारवाई झाली. परंतु, पुन्हा त्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू झाल्या आहेत. परंतु, त्यांचा त्रास कोपरीकरांना होऊ लागल्याने सुरुवातीला त्या बंद करण्यासाठी येथील रहिवाशांनी पत्रव्यवहार केला होता. परंतु, तरीदेखील त्या बंद न झाल्याने अखेर रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. अखेर, त्या बंद झाल्या. त्यानुसार, मागील सुमारे दीड महिना त्या बंद होत्या. त्यानंतर, तीनहातनाका ते घोडबंदर असा छुपा मार्ग त्यांनी सुरू केला होता. परंतु, आपल्यावर काही कारवाई होत नाही, हे समजताच या बसवाल्यांची मजल वाढली असून त्यांनी आता पूर्वेकडून आपला मोर्चा पश्चिमेकडे म्हणजेच अतिशय वर्दळ असलेल्या गोखले रोड, गावदेवी भागात वळवला आहे. कारवाई होऊ नये, या भीतीने या बस आता तीनहातनाक्यावरून हरिनिवासमार्गे गजानन वडापाववाल्याच्या येथून थेट राममारुती रोड येथून गावदेवीपर्यंत धावू लागल्या आहेत. येथून हाकेच्या अंतरावर स्टेशन असल्याने प्रवासीदेखील पुन्हा या बसने प्रवास करताना दिसत आहेत.