शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे कारागृह लवकरच सुरू करणार कैद्यांचाही पेट्रोलपंप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:25 IST

ठाणे शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पेट्रोलपंपांची संख्या खूपच कमी आहे. हे पंप मोजक्या आणि मोक्याच्या ठिकाणी आहेत. अशाच एका मोक्याच्या

- प्रज्ञा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पेट्रोलपंपांची संख्या खूपच कमी आहे. हे पंप मोजक्या आणि मोक्याच्या ठिकाणी आहेत. अशाच एका मोक्याच्या ठिकाणी आणखी एका पेट्रोल पंपाची भर पडणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह लवकरच पेट्रोल पंप सुरू करीत आहे आणि मध्यवर्ती कारागृहातील खुले बंदी या पंपावर काम करणार आहेत. शिवाय याच पंपालगत गाड्यांचे वॉशिंग सेंटरही सुरू करण्यात येणार आहे.कारागृहातील बंद्यांच्या हातांना काम मिळावे, त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांना सामान्यांसारखे आयुष्य जगता यावे, यासाठी या बंद्यांसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकी एक म्हणजे बंदींचा पेट्रोल पंप. ती लवकरच प्रत्यक्षात येईल. शिक्षा भोगल्यानंतर बंदींना बंद कारागृहातून खुल्या कारागृहात आणले जाते. त्यांना खुले बंदी म्हणतात. याच बंदींवर या पेट्रोल पंपांची जबाबदारी देण्यात येणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात असे खुले कारागृह दीड ते दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. त्यात २५ ते ३० बंदी आहेत. सुरूवातीला या पेट्रोल पंपावर दोन युनिट असतील. या ठिकाणी चार ते पाच खुल्या बंदींची, तर पैशांचा हिशोब सांभाळण्यासाठी दोन शिपायांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती कारागृह अधिक्षक नितीन वायचळ यांनी ‘लोकमत’ला दिली. सुरूवातीला सकाळी ८ ते सायं. ७ वाजेपर्यंत हा पेट्रोल पंप सुरू असेल. त्यात बंद्यांना तासाभराची जेवणाची सुट्टी देण्यात येईल. पेट्रोल पंपासाठी अद्याप जागा निश्चित करण्यात आली नसली; तरी साकेत रोड किंवा जेल तलावाच्या परिसरात तो सुरू करण्याचा मानस आहे. यापूर्वी पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु त्या प्रक्रियेला ब्रेक लागला होता. त्यामुळे पुन्हा या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू आहे. हा पंप याचवर्षी सुरू करण्याचा विचार आहे. पेट्रोल पंपाबरोबरच वाहने धुण्यासाठी वॉशिंग सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. जवळपास दहा खुल्या बंदींवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. - वाहने दुण्यासाठीची ही सुविधा सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत आणि मध्ये तासभर जेवणाची सुट्टी या वेळेत असेल. हे सेंटर पेट्रोल पंपालगतच असेल. त्याची व्यवस्था पाहणारे खुले बंदी पळून जाण्याची शक्यता नसते, म्हणूनच त्यांची या कामी नेमणूक करण्यात येणार असल्याचे नितीन वायचळ म्हणाले.