शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक पाणलोट अभियानाच्या भरतीत परप्रातींयांना प्राधान्य का?

By admin | Updated: June 1, 2016 02:18 IST

जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट अभियाना अंतर्गत झालेल्या कृषि आरटीके, उपजीविका आरटीके, समुदाय संघटक ह्या जागांसाठी करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील भरती

पालघर : जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट अभियाना अंतर्गत झालेल्या कृषि आरटीके, उपजीविका आरटीके, समुदाय संघटक ह्या जागांसाठी करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील भरती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची (जिल्हा) भरती करण्यात आली असून ती रद्द व्हावी व त्या जागी स्थानिकांची भरती केली जावी असे निवेदन पत्रकारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.त्याचप्रमाणे नवीन प्रकल्पात झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणूकांमध्ये जे स्थानिक कंत्राटी कर्मचारी गेल्या तीन वर्षापासून काम करत होते मात्र त्यांना वगळून पर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झाल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच काही जुन्या स्थानिक कर्मचाऱ्यांना दूसरा जिल्हा देऊन त्यांची मुद्दाम गैरसोय करण्यात आली आले आहे. यामुळे गेल्या तीन वर्षापासून जुन्या प्रकल्पात काम करत असलेल्या स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही मोठा अन्याय झाला आसून यात परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करतांना मोठा आर्थिकव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षित बेरोजगार तरुण असून त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला असताना पर जिल्ह्यातील तरुणांना स्थान दिल्यान जिल्ह्यातील बेरोजगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याती तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. याची दखल घेऊन जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना यामधे संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच गेल्या तीन वर्षापासून काम करत असलेल्या पालघर जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालघर जिल्ह्यातच जुन्या व नव्या प्रकल्पात नेमण्यात यावे. त्याचबरोबर स्थानिक बेरोजगारांवर झालेल्या अन्यायाची योग्य चौकशी करुन जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुणांना योग्य न्याय द्यावा. अशी मागणी समाज सेविका कविता पाडवी, कोंकण विभाग पत्रकारसंघ जिल्हा अध्यक्ष जयेश शेलार, विभाग पत्रकार संघ पालघर जिल्हा सरचिटणीस -सिद्धार्थ सांबरे, कोंकण विभाग पत्रकार संघ पालघर जिल्हा संघटक- सचिन भोईर, कोंकण विभाग पत्रकारसंघ विक्र मगड तालुका अध्यक्ष-अमोलसांबरे, राहुल पाटिल यानी निवेदनाद्वारे कृषी अधिकारी पालघर व आमदार अमीत घोडा यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)