शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

भरपाईची मूळ रक्कम १३ लाख अन् त्यावरील व्याज मात्र १४ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:59 IST

२७ लाख ६०० रुपये जमा करा; कारागृह महानिरीक्षकांवर ओढवली नामुश्की

- नारायण जाधव ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या ताब्यात असलेल्या एका वाहनाने २००४ मध्ये केलेल्या अपघातप्रकरणी दावेदारास मूळ नुकसानभरपाई १२ लाख ९७ हजार १६० रुपये अन् त्यावरील व्याज मात्र १४ लाख सात हजार ४१८ रुपये ६० पैसे अशी एकूण २७ लाख चार हजार ५७९ रुपये जमा करण्याची नामुश्की अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांवर ओढवली आहे. ही रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोटार वाहन अपघात दावा प्राधिकरणाकडून ठाणे जिल्हा न्यायाधीशांकडे अनामत रक्कम म्हणून जमा करण्यास सांगितल्याने त्यानुसार गृह विभागाने त्यास मंजुरी दिली आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाच्या नावे असलेले वाहन क्रमांक एचएच ०९ यू ८५१८ यास १७ एप्रिल २००४ रोजी ठाण्याच्या खोपटनाका येथे अपघात झाला होता. ते वाहन ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी टी.जी. बांदल हे चालवित होते. यात अशोक पाल नावाचे गृहस्थ जखमी झाले होते.याप्रकरणी त्यांनी नुकसानभरपाईसाठी ठाणे जिल्हा न्यायाधीक क्रमांक ४ यांच्या कोर्टात मोटारवाहन अपघात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल अशोक पाल यांच्या बाजूने लागला होता. तेव्हा न्यायालयाने पाल यांना १२ लाख ९७ हजार १६० रुपये व त्यावर २ जुलै २००७ पासून सात टक्के इतक्या दराने व्याज देण्यास सांगितले होते. मात्र, या निकालाविरोधात कारागृह महानिरीक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात सिव्हील अ‍ॅप्लिकेशन २०१८ मध्ये पहिले अपील दाखल केले होते.मुंबई उच्च न्यायालयाने या अपिलावरील सुनावणीत राज्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांना मूळ रक्कम १२ लाख ९७ हजार १६० रुपये व त्यावरील २ जुलै २००७ पासून सात टक्के इतक्या दराने व्याज १४ लाख सात हजार ४१८ रुपये ६० पैसे असे एकूण २७ लाख चार हजार ५७९ रुपये ठाणे जिल्हा न्यायाधीक क्रमांक ४ यांच्याकडे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, गृह विभागाने ही रक्कम जमा करण्यास २० फेबु्रवारी २०२० रोजी मान्यता दिली आहे.