शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेत बीएसयूपी होणार समाविष्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:12 IST

तब्बल नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या बीएसयूपी योजनेतील केवळ एका आठ मजली इमारतीचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले

भार्इंदर : तब्बल नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या बीएसयूपी योजनेतील केवळ एका आठ मजली इमारतीचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. मात्र, उर्वरित सात इमारतींचे काम अद्याप सुरू असून रेंगाळलेल्या या योजनेला सरकारी निधीचा ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता ही योजना नवीन पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करावी, या मागणीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून तो मान्यतेसाठी महासभेपुढे आणण्याच्या तयारीत प्रशासन असल्याचे सूत्रांनी सांगितले.२००९ मध्ये काशिमीरा येथील जनतानगर आणि काशीचर्च परिसरात एकूण ३३० कोटींची बीएसयूपी योजना राबवण्याच्या प्रशासकीय प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. मंजूर प्रस्ताव पालिकेने केंद्र तसेच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला. मात्र, सरकारने पालिकेने निर्धारित केलेल्या योजनेच्या खर्चात कपात करून २७९ कोटींच्याच योजनेला मान्यता दिली. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून ५० टक्के व राज्य सरकारकडून ३० टक्के अनुदान पालिकेला देण्याचे निश्चित करण्यात आले. तर, उर्वरित २० टक्कयांपैकी ११ टक्के निधी पालिकेकडून अदा केला जाणार असून नऊ टक्के खर्च लाभार्थ्यांकडून वसूल केला जाणार आहे.या योजनेत एकूण चार हजार १३६ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येकी आठ मजल्यांच्या एकूण २३ इमारती प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जनतानगर येथील १७९ लाभार्थ्यांना पालिकेने गतवर्षी एका आठ मजली इमारतीतील सदनिकांचा ताबा दिला आहे. सुरुवातीला या योजनेला स्थानिकांकडून तीव्र विरोध झाल्याने योजना रेंगाळली. परिणामी, तिला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. अखेर, २०१३ मध्ये प्रत्यक्षात योजनेच्या कामाला सुरुवात झाली, तरी अनेकदा विकासकांनीही आर्थिक अडचणीमुळे योजना लटकत ठेवली.दरम्यान, वाढत्या महागाईमुळे योजनेचा खर्च वाढल्याने पालिकेने एकूण जागेपैकी २५ टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी विकसित करून योजनेचा खर्च भरून काढण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे पाठवला होता. तो राज्य सरकारने केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवला. त्यात सुरुवातीला बांधण्यात येणाऱ्या प्रत्येकी आठ मजल्यांच्या २३ इमारतींऐवजी दोन आठ मजल्यांच्या आणि प्रत्येकी १६ मजल्यांच्या सहा इमारती बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्याला मान्यता देण्यात आली.या योजनेच्या सरकारी खर्चानुसार पालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे २२३ कोटींचे अनुदान मिळणे अपेक्षित असताना अद्याप जवळपास ७० कोटींचेच अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातच गेल्या नऊ वर्षांपासून ही योजना सुरू असल्याने सरकारने पालिकेला निधी देण्यासच ब्रेक लावला आहे. एका आठ मजली आणि १६ मजली सहा इमारतींचे काम सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सरकारी अनुदानाखेरीज योजना पूर्ण कशी करायची, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.