शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांची बतावणी: कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:42 IST

कर्ज मिळवून देण्यासाठी दोन नामांकित कंपन्याच्या नावाखाली एका फार्मासिटीकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देदोन कोटींची रक्कम देण्याचे अमिषचितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दोन कोटींचे कर्ज मिळवून देण्यासाठी दोन नामांकित कंपन्याच्या नावाखाली एका फार्मासिटीकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपींच्या शोधासाठी एका विशेष पथकाचीही निर्मिती करण्यात आली आहे.ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील वसंत विहार भागातील ५१ वर्षीय गृहस्थ हे वागळे इस्टेट येथील एका फार्मासिटीकल कंपनीचे उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) आहेत. एका इंग्रजी सायं दैनिकात प्रसिद्ध झालेली ‘पारस फायनान्स’ गव्हर्टमेन्ट अँप्रुव्हल मार्कशिट, अ‍ॅग्रीकल्चर, बिझनेस, पर्सनल लोन २४ तासात मिळेल, अशी जाहिरात त्यांनी वाचली होती. ही जाहिरात वाचून त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्र मांकावर संपर्क साधला. हा फोन सुनील चव्हाण नामक व्यक्तीने घेतला. त्याच्याकडे त्यांनी कर्जाबाबतची चौकशी केली. तेंव्हा त्यांनी आवश्यक कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडे केली. त्याने दिलेल्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर त्यांनी कागदपत्रेही पाठवली. ती पडताळून तुम्हाला दोन कोटींचे कर्ज मंजूर होईल, असे त्यांना भासविण्यात आले. पण शुल्क लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली या उपाध्यक्षांकडून वेगवेगळया बँक खात्यावर १४ लाखांची रक्कम घेण्यात आली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढची रक्कम भरली नाही. कर्जाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी एका मोठया वित्तीय कंपनीच्या मोबाईल क्र मांकावर संपर्क साधला. तिथेही त्यांच्याकडून अशाच प्रकारे ८७ लाख ५० हजार रुपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. या दोन्ही कथित फायनान्स कंपन्यांनी मिळून जुलै ते आॅक्टोबर २०१९ या कालावधीत त्यांच्याकडून सुमारे एक कोटी एक लाख ६४ हजारांची फसवणूक केली. ही फसवणूक झाल्यानंतर त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणूकीबाबतचा अर्ज दिला. याच प्रकरणी चौकशी करुन २१ सप्टेंबर २०२० रोजी चितळसर पोलीस ठाण्यात दोन वित्तीय कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियत्तमा मुठे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी