शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला!

By admin | Updated: October 19, 2015 01:07 IST

केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुतांश प्रभागांमध्ये बहुरंगी लढती असल्याने सगळयाच पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अपक्ष आणि विविध राजकीय पक्षांचे एकुण ७५० उमेदवार रिंगणात आहेत

प्रशांत माने, कल्याण केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुतांश प्रभागांमध्ये बहुरंगी लढती असल्याने सगळयाच पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अपक्ष आणि विविध राजकीय पक्षांचे एकुण ७५० उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक १९ उमेदवार प्रभाग क्रमांक ९४ आनंदवाडी प्रभागात असून २३ प्रभागांमध्ये पंचरंगी लढत पहावयास मिळणार आहे.केडीएमसीच्या १२२ प्रभागांपैकी तीन प्रभागातील उमेदवार बिनविरोध तर अन्य दोन प्रभागांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ११७ प्रभागांत निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार प्रक्रियेनंतर भाजप १०९, शिवसेना ११५, काँग्रेस ५६, राष्ट्रवादी ४५, मनसे ८५ , रिपाई ६, बसपा २५, बहुजन विकास आघाडी २०, कम्युनिस्ट पक्ष ४, राष्ट्रीय समाज पक्ष ८, मार्क्सवादी पक्ष १, भारीप बहुजन महासंघ ६, समाजवादी पक्ष २, पिपल्स रिपब्लिकन पक्ष १, फॉरवर्ड ब्लॉक ९, एमआयएम ६ आणि अपक्ष २५२ असे ७५० उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. शिवसेना भाजपा स्वतंत्रपणे लढत असून आघाडी होऊनही काँग्रेस राष्ट्रवादीत सद्यस्थितीला उमेदवार उभे करण्यावरून बेबनाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे मनसे स्वबळावर नशीब आजमावत आहे. रिपाई भाजपाची युती असली तरी जागावाटपावरून रिपाई नाराज आहे. तर डाव्या विचारसरणीचे पक्ष एकत्रित येऊन लढत आहेत. छोटया-मोठया आघाडयांमध्ये प्रस्थापित पक्षांची कसोटी लागणार आहे. बहुतांश प्रभागांमध्ये बहुरंगी लढत असून आढावा घेता कल्याण पुर्वेकडील आनंदवाडी प्रभागात १९ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा फैसला मतदार करणार आहेत.