शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांवर कारवाईवेळी दबाव

By admin | Updated: March 15, 2017 02:20 IST

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना बहुतांशी वेळा पोलिसांवर लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठांचा दबाब येतो

डोंबिवली : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना बहुतांशी वेळा पोलिसांवर लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठांचा दबाब येतो. हे योग्य नाही. शहरात ठिकठिकाणी कोंडी जरी होत असली तरीही वाहतूक पोलीस सूपरमॅन नाहीत. नागरिकांनी उपोषणापेक्षा वाहतूक पोलिसांच्या समस्या विचारात घेऊन त्यांना ‘पोलीस मित्र’ म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण वाहतूक विभागाचे अधिकारी बाळासाहेब आव्हाड यांनी येथे केले. शहरातील कोडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस ठोेस उपाययोजना करत नसल्याने नगरसेवक मंदार हळबे यांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर रविवारी बोडस मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत आव्हाड बोलत होते.ते म्हणाले की, नागरिकांनी वाहनांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. त्याउलट चालवण्यावर भर द्यावा. आधीच या शहरातील रस्ते अरुंद आहेत. तर वाहने अधिक आहेत. इंदिरा गांधी चौकात कारवाईच्या वेळी लायसन्स तपासले, पण केवळ ५० टक्केच रिक्षाचालक दिसले. अन्य कुठे गेले, अशा वेळी नागरिकांच्या सतर्कतेची, जागृतीची अपेक्षा असते. पण तसे होत नाही. रेल्वे स्थानक परिसरातून पाच नागरिक वावरतात. कोंडीमुळे तेथे त्यांची गैरसोय होते. पण तेथील जाग वाढत नसून, लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच तेथील फेरीवाल्यांवरही सातत्याने कारवाई व्हायला हवी. त्यासाठी महापालिकेलाही जाब विचारायला हवा. ठाकुर्लीचा उड्डाणपूल वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही, असे ते म्हणाले.शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी गोविंद गंभीरे यांनीही त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. सध्या कागदोपत्री २३ अधिकारी-कर्मचारी आहेत. परंतु, विविध कारणांमुळे दिवसाला १२ कर्मचारी उपस्थित असतात. नागरिकांनी पोलीस मित्र म्हणून पुढे यावे. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा फटका वाहतुकीला बसत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करताना अडचणी येतात. पण तरीही कोणतीही टीका-टिपण्णी न करता, कारणे न देता माझे सर्व कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत. सध्या आणखी एका टोइंग व्हॅनची गरज आहे. त्यासाठी हळबे यांनी १० लाखांचा निधी देण्याचे म्हंटले तरी तसा निधी घेता येत नाही. त्यासाठी त्यांनी ठाण्यातील वरिष्ठांना साकडे घालावे, असे गंभीरे म्हणाले. या बैठकीचे अध्यक्ष पी. जी. कुलकर्णी यांनी, वाहतूक नियंत्रणाची कौशल्ये सांगितली. शहरात सिग्नलचे जाळे नाही, ही शोकांतिका आहे. रेल्वेचे सिग्नल बिघाडल्यास सर्वत्र गोंधळ उडतो. पण शहरातील ही यंत्रणा तीन वर्षे बंद असूनही काहीच हालचाल होत नाही. यावरूनच या शहरातील नागरिक व पोलीस किती सतर्क आहे, हे लक्षात येते. सिग्नलसाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)