शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येऊर पर्यटन केंद्राचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:06 IST

येऊर येथील सुमारे ८९६२ चौ.मी. जमिनीवर वन खात्याच्या आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ‘पर्यटनस्थळ’ विकसित करून पर्यटकांना आकर्षण ठरेल असे ‘निसर्ग उद्यान’ व आदिवासी समाजाची जीवनशैली दाखवणारे ‘आदिवासी संस्कृती कला केंद्र’ उभारण्यात येणार आहे.

ठाणे : येऊर येथील सुमारे ८९६२ चौ.मी. जमिनीवर वन खात्याच्या आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ‘पर्यटनस्थळ’ विकसित करून पर्यटकांना आकर्षण ठरेल असे ‘निसर्ग उद्यान’ व आदिवासी समाजाची जीवनशैली दाखवणारे ‘आदिवासी संस्कृती कला केंद्र’ उभारण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिकेने तयार केलेला पर्यटन केंद्राचा प्रस्ताव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांच्याकडे महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सादर केला. त्यामुळे आता खºया अर्थाने या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.सर्वसामान्य पर्यटकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी अशाप्रकारचे केंद्र उभारल्यास आदिवासी बांधवांना या केंद्राच्या माध्यमातून वेगळी दिशा मिळून, मूळ आदिवासी संस्कृतीबद्दल लोकांना माहिती मिळू शकणार आहे. हे पर्यटन केंद्र विकसित करीत असताना मूळ आदिवासी संस्कृती जपण्यासाठी त्यांचे राहणीमान, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांचा तारपासारखा नृत्याविष्कार, त्यांना अवगत असलेली वारली पेंटिंगसारखी कला व इतर विविध क्षेत्रात आदिवासी बांधव ज्या कलांमध्ये परंपरागत आहेत, त्या सर्व कलांना प्रोत्साहन देण्याचे काम या केंद्रातून करता येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अन्य अभयारण्याच्या धर्तीवर येऊर येथील निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवून वेगवेगळ््या प्रकारचे अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, शालेय विद्यार्थ्यांना पशु, पक्षी, वनस्पती तसेच आदिवासी संस्कृतीची माहिती मिळावी याकरिता शैक्षणिकदृष्टीने विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येऊर येथील डोंगरकड्यालगत वर्षातील ३६५ दिवस पाणी साठून तलाव निर्माण झाले असून या तलावात बोटिंग तसेच पर्यटनाच्यादृष्टीने इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे माहिती या प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आ. सरनाईक यांनी सोमवारी हा प्रस्ताव सादर केला.आदिवासींना रोजगारया पर्यटन केंद्रामुळे येऊर येथील आदिवासींना रोजगारही मिळणार असून या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ठामपाच्या उत्पन्नाचा स्रोतदेखील वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनखात्याच्या परवानगीनंतर लवकरच येथील कामाला सुरुवात होणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांनी महिन्याच्या आत वनखात्याची कायदेशीर परवानगी पूर्ण करून घेण्याची जबाबदारी घेतल्याने येऊर पर्यटन केंद्राच्या कामाला गती प्राप्त झालेली असून दोन महिन्यांत याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :thaneठाणेtourismपर्यटन