शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अभिनय कट्ट्यावर ‘झेंडा हरवला आहे’चे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:30 IST

सांस्कृतिक कार्यक्रमात बालकांचाही सहभाग

ठाणे : देशात अनेक रंगांच्या झेंड्यांमध्ये तिरंग्याचा रंग कुठेतरी हरवत चालला आहे, त्याचा शोध घेऊन कलाकार म्हणून समाजाचे आपण काही देणे लागतो, अशाच विचाराने अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक कलाकृतींतून समाजप्रबोधन करण्यात आले. त्यापैकी प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी ‘झेंडा हरवला आहे’ ही एकांकिका सादर करून देशभक्तीचे प्रबोधन केले.कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांच्या संकल्पनेतून परेश दळवी लिखित, आदित्य नाकती दिग्दर्शित ही एकांकिका सादर करण्यात आली. देशातील अनेक झेंड्यांमागे आंधळेपणाने धावणाऱ्या एका कार्यकर्त्याची आणि एका माजी सैनिकाची गोष्ट म्हणजे ‘झेंडा हरवला आहे’. फक्त दोन दिवस देशभक्तीचा इव्हेंट करण्यापेक्षा रोज देशासाठी त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पोलिसांना आठवून मनात एक कृतज्ञतेचा एक दिवा मनात लावून तो जपावा, हा संदेश यावेळी दिला. ही एकांकिका सहदेव साळकर, ओमकार मराठे, महेश झिरपे, अमोघ डाके या कलाकारांनी सादर केली.यासोबत, कट्ट्याच्या कलाकारांनी कदीर शेख दिग्दर्शित ‘ये मेरे वतन के लोगो’ आणि ‘ये वतन वतन’ या देशभक्तीपर सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची कड ओलावली. या सादरीकरणात आदित्य नाकती, परेश दळवी, राजन मयेकर, शिन जाधव, धनेश चव्हाण, वैभव पवार, आतिश जगताप, संज्योत बावीसकर, उत्तम ठाकूर, शुभम कदम, कुंदन भोसले, रोहित सुतार, महेश झिरपे, सहदेव कोळंबकर, वैभव चव्हाण, न्यूतन लंके, विजया साळुंके आणि रोहिणी थोरात या कलाकारांनी सहभाग घेतला. तसेच, परेश दळवी दिग्दर्शित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ याचे सादरीकरण कट्ट्याच्या बालसंस्कार वर्गाच्या बालकलाकारांनी केले.या सादरीकरणात श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्ये, अमोघ डाके, अर्णय वाघ, अद्वैत मापगावकर, अस्मी शिंदे, पूर्वा तटकरे, वैष्णवी चेऊलकर, प्रथम नाईक, रु चिता भालेराव या बालकलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे निवेदन राजन मयेकर यांनी केले.