शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजकांकडून नियम धाब्यावर; ध्वनिप्रदूषण, दोन शस्त्रक्रिया केल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:13 IST

ठाण्यातील दहीहंडीवरील शिवसेनेचा वरचष्मा पुसून टाकण्याकरिता भाजपाने प्रथमच आयोजित केलेल्या दहीहंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नियमांना आयोजकांनी हरताळ फासला.

ठाणे : ठाण्यातील दहीहंडीवरील शिवसेनेचा वरचष्मा पुसून टाकण्याकरिता भाजपाने प्रथमच आयोजित केलेल्या दहीहंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नियमांना आयोजकांनी हरताळ फासला. या बेकायदा कृत्याकरिता ज्या पोलीस, पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी कारवाईचा आसूड उगारायचा, तेही मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर हारतुरे स्वीकारत असल्याचे पाहायला मिळाले.स्वामी प्रतिष्ठानने ज्या ठिकाणी ही हंडी बांधली होती, त्याच्या मागील बाजूस लहान मुलांचे खासगी इस्पितळ आहे. सोमवारी शाळेला सुटी असली, तरी हाकेच्या अंतरावर शाळा आहे. परंतु, या सर्व बाबी दुर्लक्षित करून आयोजकांना अनुमती कशी दिली गेली, असा सवाल केला जात आहे.मोठा गाजावाजा करून यंदा ठाण्यात प्रथमच भाजपाच्या वतीने सर्वात मोठी हंडी उभारण्यात आल्याने समस्त ठाणेकरांच्या नजरा तिकडे लागल्या होत्या. बड्या रकमेच्या बक्षिसांमुळे गोविंदा पथकांची धमाल झाली असली आणि आयोजकांचे हित साधले गेले असले, तरी या परिसरातील हिरानंदानी मेडोज, म्हाडाच्या इमारतीत राहणाऱ्या सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले. दहीहंडी असल्याने काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चक्क बंद ठेवले होते. ध्वनिप्रदूषणाने सर्व मर्यादा ओलांडली होती. मुख्यमंत्री येणार म्हणून दीड तास अगोदर येथील चारही बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले होते. या मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली होती. येथील गृहनिर्माण सोसायट्यांना आपली प्रवेशद्वारे बंद ठेवावी लागली. त्यांच्या गेटसमोर गोविंदा पथकांनी, भाजपा कार्यकर्त्यांनी बिनदिक्कत वाहने उभी केल्याने या सोसायट्यांमधील रहिवाशांना बाहेर पडणे मुश्कील झाले. मुख्यमंत्र्यांना आपला चेहरा दिसावा, याकरिता भाजपाचे आमदार, नगरसेवक यांनी दहीहंडीकडे धाव घेतली होती. मात्र, त्यांनाही पोलिसांनी अडवल्याने हुज्जत घालणे, वाद असे प्रकार सुरू होते. मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर जाऊन फोटो काढून चमकण्याची स्वप्ने भंग पावलेले हे नगरसेवक, पदाधिकारी गर्दीत घाम पुसत केविलवाणे उभे होते. माथाडींचे नेते शिवाजी पाटील यांनी हिरानंदानी मेडोज येथे प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांची हंडी ही शहरातील सर्वात मोठी हंडी ठरली. त्यांनी १० थर लावणाºया पथकाला २५ लाखांचे बक्षीस देऊ केले होते. अगोदरच गोविंदा पथकांच्या बसगाड्या, भाजपा आमदार, नगरसेवक, पदाधिकाºयांची वाहने यांनी हा परिसर जॅम असताना रहिवाशांनाही आपापली वाहने दूरवर सोडून जाण्याची सक्ती पोलिसांनी केल्याने पोलीस व रहिवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे आमदार संजय केळकर आणि गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. केळकरांना काहीशी धक्काबुक्की झाली. भाजपाचे नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे आदींसह महिला नगरसेविकांनी स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांनी पोलिसांशी हुज्जत घालत काढता पाय घेतला.या मंडळाने अख्खा रस्ताच बंद केल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे टीएमटीच्या बसची वाहतूक वळवण्यात आली होती. रुग्णालय व्यवस्थापनाला दोन तातडीच्या शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या.काही ठरावीक उत्सवांसाठी ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत मर्यादेतून सूट देण्यात येते. परंतु, दहीहंडी उत्सवात ती सूट दिलेली नाही. तसे पत्रक ठाणे जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना ध्वनिप्रदूषणाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.परंतु, स्वामी प्रतिष्ठानच्या हंडीत मुख्यमंत्र्यांबरोबर जिल्हाधिकारी व पोलीस आणि पालिका आयुक्त हजर होते व आपणच काढलेल्या आदेशांवर फिरणारा वरवंटा त्यांनी याचि देही, याचि डोळा पाहिला. त्यामुळे कारवाई होणार का, असा प्रश्न आता रहिवासी उपस्थित करत आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणे