शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर नसल्याने गर्भवतीची फरफट

By admin | Updated: June 19, 2017 03:47 IST

आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठी शासनाने सुमारे २ कोटी खर्चून उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नाही. तसेच या

लोकमत न्यूज नेटवर्ककसारा : आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठी शासनाने सुमारे २ कोटी खर्चून उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नाही. तसेच या आरोग्य केंद्राला टाळे असल्याने ही महिला आरोग्य केंद्राच्या आवाराबाहेरच प्रसूत झाल्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथे रविवारी दुपारी घडली.संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या खरपत (सावरोली) येथील अलका महेश मेंगाळ (२८) या महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिचा पती महेश मेंगाळ आणि नातेवाईकांनी तिला जवळच्या टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी तथा वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर उपलब्ध नव्हते. एवढेच नव्हे तर या रुग्णालयाला चक्क टाळे होते. दरम्यानच्या काळात अलकाला जास्तच त्रास होऊ लागल्याने पतीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात बसविले आणि तो डॉक्टर, नर्स यांचा शोध घेण्यासाठी धावाधाव करू लागला. एकीकडे प्रचंड वेदनेने त्रस्त झालेल्या या महिलेच्या मदतीस आसपासच्या महिलांनी धाव घेतली. दोन तासांच्या या धावपळीत एकही आरोग्य कर्मचारी तथा डॉक्टर उपलब्ध न झाल्याने अखेर ही महिला रुग्णालयाच्या आवारातच प्रसूत झाली. अखेर टाकीपठार येथे डॉक्टर नसल्याने उपचारासाठी महेश मेंगाळ याने आपल्या पत्नीला किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु तेथेही तिच स्थिती. अखेर दुपारी ३ च्या सुमारास सदर महिलेस शेणवा येथील आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील उपचार सुरू केले.