शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये सर्वत्र पूरस्थिती, ६९ जणांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मुसळधार लावलेल्या पावसाने मीरा-भाईंदरकरांची झोप उडवली. शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून, घरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : मुसळधार लावलेल्या पावसाने मीरा-भाईंदरकरांची झोप उडवली. शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून, घरात पाणी शिरले आहे. तर दुर्घटना घडू नये म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाने पाण्यात अडकलेल्या ६९ जणांची सुटका केली. महाजनवाडी येथे पाण्याच्या लोंढ्याने एका घराची पडझड, तर २० ते २२ दुचाकी वाहून गेल्या.

शनिवारच्या मध्यरात्रीपासून पावसाने ‘जाेर’धार लावल्यामुळे घरात गुडघाभर पाणी साचल्याने लोकांना रात्र जागून काढावी लागली. शहरातील महाजन वाडी, काशिमीरा, सिल्व्हर पार्क, विजय पार्क, चंद्रेश, शांतीनगर, शीतलनगर, कृष्ण स्थळ, विनय पार्क, सिल्व्हर सरिता, पटेल कम्पाउंड, खारीगाव, तलाव मार्ग, बेकरी गल्ली, विनायकनगर, नवघर मार्ग, गोडदेवसह अन्य अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रात्रीपासून सकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाणी उपसा करणारे पालिकेचे पंप सुरू नव्हते. पाण्यात अडकलेले अनेक नागरिक पंप सुरू करा म्हणून प्रयत्न करत होते. घरातील धान्य, विजेची उपकरणे यांची नासधूस झाली आहे. शहरातील अनेक रस्ते तर पाण्याखाली गेले होते. इमारतीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी शिरल्याने अनेकांना पाण्यावाचून राहावे लागले. औद्योगिक वसाहती व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले.

महाजनवाडी येथे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधील डोंगरांवरून पाण्याचा प्रचंड लोंढा वाहत होता. पाण्याचा वेग इतका होता की, सुमारे २० ते २२ दुचाकी वाहून गेल्या. गावदेवी कम्पाउंड, गायत्री चाळीमधील रामू पाटील यांच्या घराची या लोंढ्याने पडझड झाली. लोकांचे सामान वाहून गेले. पाण्याच्या लोंढ्यात अडकलेल्या ५२ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. माशाचा पाडा मार्ग परिसरातही डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या पूरस्थिती बिकट बनली होती.

मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली गेला होता. महामार्गावर एका मोटारकारमध्ये अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाने वाचविले. गायत्री इमारतीच्या तळ मजल्यातून पाण्यात अडकलेल्या पाच जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. सिल्वर सरिता इमारतीमधून पाच जण तर येथील एका दूध टँकरमधून तीन जणांची सुटका केल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. सकाळपर्यंत अनेक भागांतील पाणी उतरले नव्हते. लोक नगरसेवकांना शोधत शिमगा करत होते. काही नगरसेवक रात्रीपासून लोकांच्या संपर्कात होते. सकाळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले आदींनी शहरात फिरून आढावा घेतला.

बेकायदा बांधकामांमुळे घात

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराळ भागातून पाण्याचे लोंढे येत असताना महाजन वाडी, माशाचा पाडा मार्ग परिसरात नैसर्गिक ओढ्यांमध्ये बेकायदा बांधकामे झाली आहेत. शहरातील खाड्या व नैसर्गिक नाल्यांवर भराव करून बांधकामे उभी राहिली आहेत. शहराची कवचकुंडले असलेल्या कांदळवन, पाणथळ, सीआरझेड भागात भराव आणि बांधकामे झाल्याने पाण्याचा निचरा होणारे मार्ग व वॉटरहोल्डिंग क्षेत्र नष्ट झाल्याने शहरात पूरस्थिती होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही बांधकामेच पूरस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.