शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये प्रचाराची रणधुमाळी

By admin | Updated: February 9, 2017 03:57 IST

शिवसेना, भाजपा-ओमी टीम, साई पक्षासह इतर लहानमोठ्या पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली आहे. सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी घरोघरी जाऊन

उल्हासनगर : शिवसेना, भाजपा-ओमी टीम, साई पक्षासह इतर लहानमोठ्या पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली आहे. सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारराजाची भेट घेणे सुरू केले असून प्रभागनिहाय रॅलीवर भर दिला आहे. उल्हासनगर पूर्वेत शिवसेनेचे नगरसेवक रमेश चव्हाण, सुरेश जाधव, विजय ठाकूर, शेखर यादव, अरुण आशान भाजपाचे राजा गेमनानी, नरेंद्र राजानी, नितीन बोबडे, मीना सोंडे, काँग्रेसच्या अंजली साळवे, जया साधवानी, राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री यांनी प्रचाराचा नारळ फोडला. उमेदवार सकाळी ९ वाजता मतदारांच्या दारात कार्यकर्त्यांसह उभे राहत असून मत देण्याची विनंती करीत आहेत. शिवसेना प्रचाराची जबाबदारी आमदार बालाजी किणीकर, कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी, तर भाजपाचे राजा गेमनानी यांच्याकडे आहे. इतर पक्षांचे उमेदवार स्वत: प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहे. शहर पश्चिममधून भाजपाच्या प्रचाराची जबाबदारी कुमार आयलानी, ओमी कलानी यांच्यावर आहे. भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार आयलानी, तर भाजपातील टीमच्या सदस्याचा प्रचार ओमी कलानी स्वत: करत आहेत. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी कॅम्पनिहाय प्रचार पथकाची स्थापना केली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भारिप, रिपाइं पक्षांचा प्रचार सद्य:स्थितीत उमेदवार कार्यकर्त्यांना घेऊन करत आहेत. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हे मिळताच त्यांनीही प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र शहरात आहे. (प्रतिनिधी)