शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रांजल पाटीलवर अमेरिकेत होणार उपचार

By admin | Updated: June 1, 2016 02:27 IST

माझ्या रेटिनात दोष असल्यामुळे कुणी जीवंत किंवा मृत व्यक्तीने मला नेत्रदान केले तरीही मला त्याचा लाभ होणार नाही. रेटिनाच्या दोषामुळे

सदानंद नाईक, उल्हासनगरमाझ्या रेटिनात दोष असल्यामुळे कुणी जीवंत किंवा मृत व्यक्तीने मला नेत्रदान केले तरीही मला त्याचा लाभ होणार नाही. रेटिनाच्या दोषामुळे दृष्टीहीन असलेल्यांना दृष्टी लाभावी यावर अमेरिकेत संशोधन सुरु असून ते उपचार करून घेण्याकरिता आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, असे अंधत्वावर मात करीत यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या प्रांजली पाटील हिने सांगितले.कोलकाता येथील समरकुमार दत्ता बक्षी यांनी जीवंतपणी प्रांजलला आपला एक डोळा बहाल करण्याची तयारी दाखवली होती. ६६ वर्षीय समरकुमार यांनी म्हटले आहे की, माझे आता फारसे आयुष्य राहिलेले नाही. त्यामुळे माझा एक डोळा मी प्रांजलला द्यायला तयार आहे.’समरकुमार यांच्या भावना कानावर आल्याने मी गहिवरले, असे सांगून प्रांजल म्हणाली की, दादर येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. नटराजन यांच्याकडे माझी लहानपणापासून तपासणी सुरू आहे. हैद्राबाद येथील अपोलो हॉस्पिटल येथेही उपचार झाले आहेत. मात्र डोळयामागील पडदा निकामी झाल्याने अन्य व्यक्तीचा डोळा बसवल्याने मला दृष्टी येणार नाही. रेटिनाच्या दोषावर अमेरिकेत संशोधन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्या संस्थेच्या संपर्कात आम्ही आहोत. त्या उपचारांनी पुन्हा दृष्टी येण्याची आशा आहे. उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील चाळीत राहणारी प्रांजल लहेनसिंग पाटील लहानपणापासूनच हुशार होती. वयाच्या १२व्या वर्षानंतर प्रांजलला अधंत्व येणार असल्याची कल्पना डॉक्टरांनी पाटील कुटुंबाला दिली होती. अंधत्व आल्यावर तिचे कसे होणार? ती स्वत:च्या पायावर कशी उभी राहणार? अशी चिंता आई-वडीलांना भेडसावत होती. मात्र अंधत्वावर मात करीत प्रांजलने यूपीएससी परीक्षेत बाजी मारली.