शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ठाण्यातील अभिनय कट्टयाची संध्याकाळ रंगली डूबाईटी या एकांकिकेच्या प्रयोगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:54 IST

विविध कलाकृती सादर करणाºया अभिनय कट्ट्यावर या रविवारी एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्याची संध्याकाळ ही ‘डूबाईटी’ या एकांकिकेच्या प्रयोगाने रंगलीसलग २० एकपात्री प्रयोग सुद्धा लक्षावधी ठरलेअभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला

ठाणे: ३५५ क्र मांकाच्या अभिनय कट्ट्याची संध्याकाळ ही ‘डूबाईटी’ या एकांकिकेच्या प्रयोगाने रंगली. यावेळी विविध कलाकारांनी सादर केलेले सलग २० एकपात्री प्रयोग सुद्धा लक्षावधी ठरले.प्रेक्षक प्रतिनिधी श्रीपाद नेमाडे आणि स्वाती नेमाडे यांच्या हस्ते दीप्रज्वलन पार पडले. निवेदिका आरती ताथवडकर यांनी सूत्रसंचालनाची सूत्रे हाती घेत कट्ट्याच्या कार्यक्र मास आरंभ केला. सई कदम, सचिन हिमुकले, रोहित मुणगेकर, लवेश दळवी, यांनी अनुक्र मे आमच्या ‘स्वयंपाकीन काकू’, ‘मी वासुसेव’, ‘अश्विन जागा होतो तेंव्हा’, ‘गुरु पौर्णिमा’ या एकपात्री सादर केल्या तर रुचिता आठवले हिने ‘किती सुंदर आहे हे जग’, प्रतिभा घाडगे यांनी ‘खरच मोबाईलची गरज आहे का?’, रोशनी उंबरसाडे हिने ‘मी.. मी आहे’ या एकपात्रीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. साक्षी महाडिक, माधुरी कोळी , राजेंद्र एडवनकर, आयुष हांडे, नरेंद्र सावंत, अनिकेत शिंदे, स्वप्नजा जाधव, शनी जाधव, विजया साळुंखे, नूतन लंके दत्तराज सकपाळ या कलाकारांनी आपापल्या एकपात्रीद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली. हितेश नेमाडे आणि परेश दळवी लिखित ‘डूबाईटी’या एकांकीकेमध्ये शिल्पा लाडवंते आणि ( शिल्पा ) परेश दळवी (कार्तिक) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एकांकिकेमधील कार्तिक आणि शिल्पा हे प्रेमी युगल संशयामुळे विभक्त होतात. पेशाने सेल्सगर्ल असलेली शिल्पा आपल्या व्यवसायचे निमित्त काढून मुद्दाम कार्तिकला भेटायला येते आणि दोघांची खरी शाब्दीक जुगलबंदी सुरू होते. यावेळी विभक्त झालेले असताना सुद्धा दोघांना एकमेकांबद्दलचे प्रेम निदर्शनास येण्यास वेळ लागत नाही आणि कथानकाच्या सरतेशेवटी त्यांच्यामधील डुबाईटी म्हणजे संशय संपून त्यांच्यातील प्रेमाचे नाते पुन्हा सुरळीत होते. आजच्या टेक्नोसाव्ही जगात नातेसंबंधात गैरसमज संशय यामुळे आलेला दुरावा हा फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपचे स्टेटस बदलून नाही दूर होणार त्यासाठी दोन व्यक्तींमधील संवाद महत्वाचा आहे आणि त्यातूनच नाती जपली जाऊ शकतात याचे सार या एकांकिकेत मांडले गेले. दिग्दर्शक हितेश नेमाडे यांनी सदर एकांकिकेत कार्तिक आणि शिल्पातील दुरावलेल्या प्रेमाचा प्रवास वादाकडून सुसंवादाकडे होताना खूपच रंजकरित्या मांडला. सदर एकांकिकेची प्रकाशयोजना स्वप्नील माने आणि संगीत संयोजन हितेश नेमाडे यांनी सांभाळले. एकांकिके नंतर दिग्दर्शक व कलाकारांनी एकांकिके दरम्यानचे किस्से आणिअनुभव सांगितले. त्यानंतर अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला. पुढच्या रविवारी अभिनय कट्ट्याचे कलाकार एक विशेष सादरीकरण घेऊन येणार आहेत तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन किरण नाकती यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकentertainmentकरमणूक