शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

तळीरामांची ठाणे पोलिसांनी केली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:30 IST

गटारी अमावस्या मद्य आणि नॉनव्हेजवर ताव मारत साग्रसंगीत निसर्गरम्य ठिकाणी पार्टीचा बेत आखणाऱ्या तरुणाईचे गट येऊरच्या जंगलात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गटारी अमावस्या मद्य आणि नॉनव्हेजवर ताव मारत साग्रसंगीत निसर्गरम्य ठिकाणी पार्टीचा बेत आखणाऱ्या तरुणाईचे गट येऊरच्या जंगलात रविवारी सकाळपासूनच येत होते. परंतु, वर्तकनगर पोलीस, वन विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कडेकोट नाकाबंदीमुळे तळीरामांना आपल्या पार्टीचे ‘दुकान’ अन्यत्र हलवावे लागले. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १५, तर मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या एकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डोंबिवलीतही शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ११ मद्यपींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.आषाढ महिन्याचा अखेरचा दिवस म्हणजे गटारी अमावस्या. या दिवशी जल्लोषात पार्टीच्या नावाखाली धांगडधिंगा करण्याचे प्रकार हे येऊर, उपवन परिसरात गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत. यातूनच या भागात फिरण्यासाठी येणाऱ्या मुलामुलींना छेडण्याचे, हाणामारीचे आणि अगदी लुटमारीचेही प्रकार होतात. या सर्वांना पायबंद घालण्यासाठी येऊर या संरक्षित शांतता वनक्षेत्रात महिला तसेच पर्यटनासाठी येणाऱ्यांना त्रास आणि मद्यप्राशन करून धिंगाणा घालणारे, छेडछाड करणाऱ्यांवर कायद्याचा वचक राहण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या वेगवेगळ्या पथकांनी रविवारी दिवसभर गस्त आणि नाकाबंदी केली होती. यात मद्यप्राशन करून आरडाओरडा करणाऱ्या एकाविरुद्ध तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १४ जणांविरुद्ध मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. या १४ चालकांची श्वास विश्लेषक यंत्रणेद्वारे तपासणी केली. त्यात त्यांनी प्रमाणापेक्षा अधिक अल्कोहोल घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस, वनविभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कोंडीमुळे गटारीबहाद्दरांची मात्र चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे अनेकांनी अन्यत्र आपला मोर्चा वळवला. काहींना पार्टीविना घरी परतावे लागले. यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून गटारीच्या निमित्ताने येऊरमध्ये होणारा धुडगूस थांबल्याची प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली. या भागामध्ये निसर्ग आणि पर्यावरणासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या येऊर एन्व्हायर्नमेंट सोसायटी संस्थेच्या तीन वर्षांच्या ग्रीन गटारी उपक्रमाचेही यातून सार्थक झाल्याचे बोलले जात आहे. या उपक्रमामुळेच या भागातील ९० टक्क्यांहून अधिक पार्ट्या बंद झाल्याचा दावा उपक्रमाचे समन्वयक रोहित जोशी यांनी व्यक्त केला. कडक तपासणीमुळे येऊर यंदा शांतगटारीच्या पूर्वसंध्येपासूनच पोलिसांनी येऊरच्या प्रवेशद्वारावर कडक तपासणी केल्यामुळे यंदा येऊरचा परिसर मद्यपींच्या उपद्रवापासून मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. येथील काही बंगल्यांमध्ये आणि रिसॉर्टमध्ये गेलेल्यांच्या पार्ट्या सुरू होत्या.