शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मजूर टंचाईवर पॉवर टिलरचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:55 IST

मजुरांची शोधाशोध करण्याच्या समस्येतून मुरबाड, शहापूर , भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात भातलागवडीसाठी शेतीची मशागत सुरू आहे. या कामातील पुरुषांची मक्तेदारी मोडून पॉवर टिलरच्या सहाय्याने महिला बचतगटातील महिला अत्यल्प मोबदला घेऊन कमी वेळेत शेताची मशागत करून देण्यासाठी ग्रामीण भागात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे मजुरांची शोधाशोध करण्याच्या समस्येतून मुरबाड, शहापूर , भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे कृषी औजार बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेद्वारे जिल्ह्यातील सक्रिय महिला बचतगटांना ट्रँक्टर, पॉवर टिलर, भात लागवड-कापणीचे यंत्र, मळणी यंत्र आदी सात प्रकारची औजारे शेतीच्या कामांसाठी दिली आहेत. मजूर नसल्याच्या कारणाखाली कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतीच्या  मशागतीचे काम आता पडून न राहता या बचतगटांच्या महिला स्वत: औजारे हाताळून सर्व शेतकºयांच्या शेतीची कामे करून देत आहेत. यासाठी कमी मोबदला देऊन काही तास आधी शेतीची कामे महिला करत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मुरबाड तालुक्यातील सक्रिय महिला बचतगटांवर लक्ष केंद्रित करून या बचतगटांसाठी शाश्वत उपजीविकेचे साधन म्हणून औजार बँक ही योजना राबवली आहे.एका बाजूला जिल्ह्यात शेती कमी होत असताना दुसरीकडे आधुनिक पद्धतीने शेती केली जात असल्याने ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.>महिलांचा चांगला प्रतिसादबळेगाव येथील प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्ष योगिता शिर्के यांनी बचत गटाला मिळालेल्या साहित्यातील पॉवर टिलर स्वत: मुरबाडच्या बाळेगाव येथील शेतांमध्ये चालवत भातलागवडीसाठी शेतीची मशागत करत आहेत. अन्य तालुक्यांत महिला बचत गट या अवजार बँकेच्या साधनांद्वारे शेतीच्या ओखरणीसह पेरणी, भातलागवड आदी कामे करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत, असे कृषी अधिकारी अंकुश माने आणि जि.प.चे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी सांगितले.