शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यामध्ये युवाशक्तीला दिशा देण्याची ताकद- एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:54 IST

राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाचा समारोप, पुढील संमेलन दिल्लीला ?

अंबरनाथ : अंबरनाथ शहराला शिवमंदिरामुळे ऐतिहासिक तर कारखानदारीमुळे औद्योगिक वारसा मिळालेला आहे. या सोबतच आता शहराला साहित्यिक वारसा देखील लाभला आहे. साहित्यामध्ये युवाशक्तीला दिशा देण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्याचा वारसा आता युवकांच्या माध्यमातून जपण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाचे अंबरनाथ शहरात आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस रंगलेल्या या महोत्सवाची सांगता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी युवाशक्तीकडे साहित्याची धुरा देण्याची गरज व्यक्त केले. तरुण साहित्यिक घडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात तरुणांना संघटीत करुन युवाशक्ती साहित्य संमेलन भरवल्यास तरुणांमधील साहित्यिकांना संधी मिळेल. अनेक तरुण साहित्याकडे ओढले जातील. तरुणांमध्ये लिखाणाचे कौशल्य आहे. त्याला वाव देण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची गरज आहे.अंबरनाथला साहित्याची गोडी आहे. त्यामुळेच येथे होणाऱ्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तीन वर्षांपासून सुरू झालेला हा फेस्टिव्हल राष्ट्रीय स्तरावरील झाला आहे. त्यामुळे कला आणि साहित्य क्षेत्रात अंबरनाथचे नाव उंचावल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. पुढील संमेलन दिल्लीला घेण्याची मागणी होत आहे. त्यासाठी जी काही मदत लागेल, ती मी नक्की करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील चौधरी यांनीही अंबरनाथमध्ये पुस्तकांचे शहर ही संकल्पना राबवली जात असल्याची माहिती दिली. लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असून देशातील पहिले साहित्य उद्यान अंबरनाथमध्ये साकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोमसापने संमेलनासाठी अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेतली नाही. त्याची प्रेरणा मराठी साहित्य परिषदेनेही घेतली. त्यामुळे कोमसाप खूप आधीपासून पुरोगामी विचारसरणीचे असल्याचे कवी अरूण म्हात्रे यांनी समारोपाच्या वेळी सांगितले. दोन दिवस रंगलेल्या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, मुलाखत, अनवट गप्पा, वाद्यसंगीत व भावगीत, मुक्त चर्चा, एकपात्री अभिनय असे कार्यक्रम आयोजित केले होते.या संमेलनाच्या निमित्ताने कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, प्रसिध्द लेखक अरविंद जगताप, कवी डॉ. महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, किरण येले असे दिग्गज साहित्यिक अंबरनाथमध्ये आले. त्यांच्या साहित्यांचा आस्वाद रसिकांनी घेतला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेambernathअंबरनाथ