शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्येच आदिवासी महिलांच्या डोक्यावर हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:54 IST

मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

रवींद्र साळवे

मोखाडा :  पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईची पहिली ठिणगी डिसेंबर महिन्यात मोखाड्यातील दापटी-१ व २ या गावांतून पडली आहे. यासह अन्य  १८  गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यामधील  १० गावपाड्यांचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा दापटीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर वणवण पायपीट करावी लागत आहे. 

मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. १००  हून अधिक गावपाडे पाणीटंचाईने होरपळतात. मात्र, यंदा दोन महिने अगोदरच तालुक्यातील दापटी-१ व  दापटी-२ या दोन गावांमध्ये डिसेंबर २०२० मध्येच पाणीटंचाई जाणवू लागली. यामुळे येथील आदिवासींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. सद्य:स्थितीत मोखाड्यातील  १८  गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त गावपाड्यांची पाहणी केल्यानंतर मोखाडा तहसीलदार कार्यालयाने दापटी-१ व दापटी-२ या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव  १७  व  २०  डिसेंबर  २०२० ला जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. 

शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त गावपाड्यांनी, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करताच त्याची  २४  तासांत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून  ४८  तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, दापटी गावांचे प्रस्ताव गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांच्या टेबलावर पडून आहेत.

तालुक्यातील १८ गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सध्या १८   गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यांनीही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीसाठी  पाठविल्याची माहिती तहसीलदार वैभव पवार आणि गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांनी दिली आहे.  मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकाही प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने मोखाड्यातील आदिवासी महिला रणरणत्या उन्हात हंडाभर  पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करीत आहेत. 

मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन, टंचाईग्रस्त गावपाड्यांना मंजुरी देऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, तीन महिने होऊनही दापटी गावांचे प्रस्ताव तेथेच पडून आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे गतसालाप्रमाणे टंचाईग्रस्त गावपाड्यांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणी आपण पालकमंत्र्यांकडे केली आहे.- प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य, पालघर.

मोखाड्यातील टंचाईग्रस्त गावपाडेदापटी-१, दापटी-२, धामणी, कुंडाचापाडा, स्वामीनगर, धनगरेवाडी, डोंगरवाडी, हेदवाडी (पाथर्डी), ठवळपाडा, पिंपळपाडा (खोच).

टॅग्स :Vasai Virarवसई विरार