शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान पार्कआणि शहरी जंगल प्रकल्पाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:53 IST

ठामपा प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोप : नगरसेवकांच्या विरोधानंतर महापौरांचा निर्णय

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या ढोकाळी येथील विज्ञान पार्क आणि शहरी जंगल उभारण्याच्या प्रकल्पाला गुरु वारच्या महासभेत महापौर नरेश म्हस्के यांनी स्थगिती दिली. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकल्पास विरोध दर्शवत, याबाबतचा प्रस्ताव सादर करताना प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोपही केला.

ढोकाळी येथील सुविधा भूखंडावर क्रीडांगणाचे आरक्षण टाकण्याच्या प्रस्तावाची सूचना २०१७ मध्ये मंजूर करण्यात आली. तरीही कुणालाही विश्वासात न घेता पालिका प्रशासनाने त्याच जागेवर विज्ञान पार्क आणि शहरी जंगल उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांचा विरोध होता. हा प्रस्ताव दिशाभूल करून आणण्यात आल्याचा आरोप करत त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. ढोकाळी भागात आधीच ३० एकरांचा भूखंड सेंट्रल पार्क उभारण्याच्या नादात विकासकाच्या घशात घालण्यात आला आहे. इतर सुविधा भूखंडही याचपद्धतीने विकासकांच्या भल्यासाठी विकले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी केला. पालिकेच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे मैदान शिल्लक राहिले नाही. त्यामुळे ढोकाळी येथील विज्ञान पार्क आणि शहरी जंगल प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. ढोकाळी भागात कलरकेम कंपनीच्या सुविधा भूखंडावर क्रीडांगण उभारण्याच्या प्रस्तावाची सूचना २०१७ साली महासभेत मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे आरक्षण बदलून कोणत्या नियमाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, असा सवाल भोईर यांनी केला.अर्थसंकल्पातील प्रस्तावाला होता विरोधहा प्रकल्प उभारताना प्रशासनाने दिशाभूल केली. ठाण्यात मुलांना खेळण्याकरिता मैदान शिल्लक नाही. त्यामुळे आहे त्या मैदानाचा वापर पार्क उभारण्याकरिता करणे चुकीचे असल्याचा आरोप नगरसेवक संजय भोईर यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी हा प्रकल्प एका बिल्डरच्या वास्तुविशारदाच्या सल्ल्याने उभा राहत असल्याचा आरोप केला. तशी कागदपत्रेच त्यांनी सभागृहासमोर सादर केली.यावर प्रशासनाला उत्तर मागताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर, त्यांचा आरोप खरा असल्याचे प्रशासनाने मान्य केले. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करत हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणे