शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रिपाइंमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:40 IST

अंतर्गत वाद; उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

- सदानंद नाईकउल्हासनगर :  देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपसोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीसोबत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केल्याने, अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजपऐवजी शिवसेना महाआघाडीसोबत आहेत. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना, भाजपमधील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत अनुक्रमे शिवसेनेच्या लीलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव यांना मतदान केल्याने ते निवडून आले. स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदन दिले. एका भाजप सदस्याने समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने पाटील सभापतिपदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असताना पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत चर्चा केल्याने रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला.भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदींसोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारिणी पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजपसोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कार्यकारिणी बरखास्त केली असेल तर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय, असाही सूर यानिमित्ताने काहींनी आळवला.रिपाइंची शक्ती विखुरलेली?शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाइंची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाइंची शक्ती अनेक गटातटांत विखुरली आहे. आठवले गटाची ताकद शहरात आहे. पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौरपद आहे. भगवान भालेराव यांच्या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.