शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जात दाखल्याबद्दल पोसरी सरपंचावर खटला

By admin | Updated: April 27, 2017 23:55 IST

‘मराठा’ असूनही ओबीसीच्या सवलती लाटण्यासाठी ‘हिंदू कुणबी’ असा जातीचा बनावट दाखला मिळविल्याबद्दल अंबरनाथ तालुक्यातील

मुंबई: ‘मराठा’ असूनही ओबीसीच्या सवलती लाटण्यासाठी ‘हिंदू कुणबी’ असा जातीचा बनावट दाखला मिळविल्याबद्दल अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर बळीराम ठाकरे यांचे पद तर गेलेच पण त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी खटलाही चालणार आहे.ज्ञानेश्वर ठाकरे यांनी या जातीच्या दाखल्यावर पोसरी ग्रामपंचायतीची निवडणूक राखीव उमेदवार म्हणून लढविली होती. नंतर ते सरपंच झाले. खोणी गावातील पिंटू मोतीराम व अभिमन्यू मोतीराम या दोन म्हात्रे बंधूनी केलेल्या तक्रारीवरून नवी मुंबईतील जातपडताळणी समितीने ज्ञानेश्वर ठाकरे यांचा जातीचा दाखला रद्द करून त्यांच्यावर लबाडीचा खटला भरण्याचा निकाल गेल्या वर्षी २ एप्रिल रोजी दिला होता.याविरुद्ध ठाकरे यांनी गेल्या जुलैमध्ये याचिका केली तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना तोपर्यंत अपात्र घोषित केले नसेल तर तूर्तास ती कारवाई करू नये, असा आदेश सुरुवातीस दिला होता. आता अंतिम सुनावणीनंतर न्या. नरेश पाटील व न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने ठाकरे यांची याचिका फेटाळली व जात पडताळणी समितीचा आदेश कायम केला.न्यायालयाने केवळ जात पडताळणी समितीच्या कामकाजावर विसंबून न राहता ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांचे शालेय रेकॉर्ड मागवून घेऊन स्वत: तपासले आणि ठाकरे यांची खरी जात हिंदू मराठा अशी आहे व त्यांनी ‘हिंदू कुणबी’ असा मिळविलेला जातीचा दाखला बनावट आहे, असा नि:संदिग्ध निष्कर्ष नोंदविला. या सुनावणीत ठाकरे यांच्यासाठी अ‍ॅड. विजय किल्लेदार यांनी, सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील आर. ए. साळुंके यांनी तर मूळ तक्रारदार म्हात्रे यांच्यासाठी अ‍ॅड. विशाल पाटील यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)