शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या एक कोटी, आधार केंद्रे अवघी १३२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अजित मांडके ठाणे : प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हा आता महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अजित मांडके

ठाणे : प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हा आता महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. परंतु, असे असले तरी लोकसंख्येच्या मानाने जिल्ह्यात अवघी १३२ आधार केंद्रे आहेत. यामुळे एखाद्याला आधार कार्डात काही किरकोळ बदल करायचे असतील तरी त्यासाठी तब्बल तीन रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांनी आधार केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे.

आजघडीला ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या जवळजवळ एक कोटीच्या आसपास आहे. परंतु, प्रत्येक ठिकाणी आधार केंद्रांची संख्या ही अपुरी आहे. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आदींसह ग्रामीण भागातही आधार केंद्रांची संख्या अपुरी आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आधार मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी ठाणे शहरातील विविध भागांतून नागरिक आधार अपडेटसाठी किंवा काही किरकोळ बदल करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आतील भागात त्यांना बसण्यासाठी आसने ठेवलेली आहेत. परंतु, असे असले तरी बाहेरील बाजूस दिवसभर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातही चौकशीसाठी किंवा आधार कार्ड प्रिंटसाठी एक खिडकी ठेवली आहे. त्या ठिकाणीदेखील तोबा गर्दी असल्याचे चित्र दिसते. तर जिल्हा परिषदेच्या आवारात दोन ठिकाणी आधार केंद्रे आहेत. त्या ठिकाणीदेखील सकाळपासून सांयकाळी ५ वाजेपर्यंत गर्दी असते. महापालिका मुख्यालयातील आधार केंद्रांवरदेखील रोजच्या रोज गर्दी दिसत आहे.

एका आधार कार्डमध्ये काही किरकोळ बदल करायचे असतील किंवा मोबाइल क्रमांक बदल करायचा असेल तर त्यासाठीदेखील आधी अर्ज भरावा लागतो. त्यानंतर रांगेत उभे राहून आपले काम करून घ्यावे लागत आहे. यासाठीदेखील दोन ते तीन तासांचा कालावधी जात आहे. त्यातही एका व्यक्तीसाठी साधारणपणे १० ते १५ मिनिटांचा कालावधी जात असतो. त्यामुळे रांगा वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काही वेळेस सर्वर डाऊन होण्यामुळेदेखील या प्रक्रियेला विलंब होताे. कोरोनामुळे जवळजवळ १० महिने आधार केंद्रेही बंद होती. त्यानंतर आता ती सुरू झाल्यानेदेखील नागरिकांची गर्दी विविध केंद्रांवर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ एक कोटी लोकसंख्येसाठी १३२ आधार केंद्रे ही अपुरी असल्याने त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

........

थम्ब इप्रेशन दिले तरी दोन ते तीन वेळा परत परत द्यावे लागते. तसेच काही वेळेस इंटरनेट स्लो असते, व्यवस्थित अपडेट होत नाही, त्यामुळे हा घोळ आधी कमी करावा. त्यामुळेदेखील आम्हाला येथे रेंगाळत राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आधारसाठी आधी नोंदणी करावी लागते. त्यानंतर तुम्हाला २ ते ३ दिवसांनी बोलावले जाते.

(महादेव मोरे - ठाणेकर नागरिक)

..........

विविध कारणांसाठी आधार अपडेट करावे लागत आहे. मला माझा मोबाइल नंबर अपडेट करायचा होता. त्यासाठीदेखील अर्ज भरा, त्यानंतर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही इंटरनेटमध्ये बिघाड आणि सर्वर डाऊन होत असल्याने यात आधी सुधारणा करावी.

(सायली तांबे - महिला, ठाणेकर)

...........

का करावे लागते आधार नूतनीकरण

प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हाच मुख्य पुरावा म्हणून लागत आहे. रेशनिंग कार्ड असो किंवा बँक खाते सर्वच ठिकाणी आधार महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे आधारमध्ये काही बदल असल्यास, मोबाइल क्रमांक बदलल्यास, नावात बदल असल्यास तसेच वयाच्या ५व्या, १०व्या आणि १५व्या वर्षांनंतर आधार नूतनीकरण करावे लागते.