शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जीव टांगणीलाच..!

By admin | Updated: June 20, 2016 02:14 IST

चार ते पाच वर्षापासून स्कूलबसचा विषय विविध समस्यांमुळे सतत चर्चेत राहिला आहे. नियम धाब्यावर बसवून ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे

चार ते पाच वर्षापासून स्कूलबसचा विषय विविध समस्यांमुळे सतत चर्चेत राहिला आहे. नियम धाब्यावर बसवून ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे पालन होत नाही.परिणामी विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. तिन्ही शहरात ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी स्कूलबसचे सर्वेक्षण केले असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, त्याचा घेतलेला आढावा..

.यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होऊन १५ दिवस झाले. बच्चे कंपनीच्या किलबिलाटाने शाळांचा परिसर गजबजूही लागला; पण हे विद्यार्थी ज्या स्कूलबसमधून येतात त्या सुरक्षित आहेत का, याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. प्रत्येक पालक आपल्या पाल्याला बसमध्ये सोडतो आणि निघून जातो; पण तो ज्या वाहनातून प्रवास करतो त्यांनी नियम पाळले आहेत का याची साधी चौकशी करण्याचीही तसदी घेत नाही. स्कूलबसबाबत काय नियम आहे, काय धोरण आहे याबाबत पालक अनभिज्ञ असतो आणि त्याचा फायदा हे स्कूलबसचालक घेतात.

दरवर्षी स्कूलबसचालक शुल्कात ३०० ते ५०० रुपयांची वाढ करतात; पण सरकार, वाहतूक शाखेचे नियमांची पूर्णत: अंमलबजावणी करता येणार नाही असे सांगून विद्यार्थी सुरक्षिततेबाबत आपल्यावरील जबाबदारी झटकतात. शाळा व्यवस्थापनाने स्कूलबसचालकांशी सांमजस्य करार करावा, असा नियम आहे; पण हा करार केल्यानंतर स्कूलबसची जबाबदारी आपल्यावर येईल या भीतीने बहुतांश शाळा अशा प्रकारचा करारच करत नाहीत. जर शाळांनी अशा प्रकारचा करार केल्यास तो आमच्या आणि पालकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असे स्कूलबस संघटेनेचे म्हणणे आहे. शाळांनी केवळ ही बस आमच्यासाठी चालविली जाते, असे पत्र लिहून द्यायचे असते; पण शाळाव्यवस्थापनाचे म्हणणे आहे की आम्ही शिकविण्याचे काम करणार की स्कूलबसचालक नियमांचे पालन करतात की नाही हे पाहणार अशी पळवाट काढून ते यातून जबाबदारी झटकतात. शाळा आणि स्कूलबसचालक हात वर करून मोकळे होतात; पण खास करून पालकही स्कूलबसच्या बाबतीत गांभीर्याने फारसे पाहत नाही हेही विशेष. या सगळ््या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरात वाहतूक करणाऱ्या स्कूलबसची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सुरक्षेचे नियम सर्रास धाब्यावर बसवून वाहतूक सुरळीत सुरु असल्याचे निदर्शनास आले. नियमांचे उल्लंघन होऊनही संबंधित यंत्रणा कुठलीच कारवाई करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्कूल बससाठी असलेल्या नियमांत दिलेल्या आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी आरटीओने ३१ मेपर्यंत बसमालकांना मुदत दिली होती; परंतु बस मालकांनी ही मुदत १५ जूनपर्यंत वाढवून मागितली होती. मात्र १५ जून उलटूनही अनेक स्कूलबस चालकांनी आरटीओचे नियम धाब्यावर बसविल्याचे आढळून आले. मे २०११च्या स्कूलबसबाबत असलेल्या सरकारच्या नियमावलीनुसार स्कूलबसला जाळी बसविणे नियमात नाही. त्याप्रमाणे स्कूलबसला जाळी नसल्याचे आढळून आले असले तरी काही नामांकित शाळांच्या स्कूल व्हॅनला मात्र जाळी असल्याचे निदर्शनास आले. स्कूलबसवर दूरध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे; परंतु काही शाळांच्या बसवर हे क्रमांक पुसट झाल्याने ते दिसेनासे झाले आहेत. नियमावलीनुसार शाळांनी बसमालकांसोबत केवळ एक सामंजस्य करार करणे आवश्यक आहे. मात्र हा करार केला म्हणजे स्कूलबसची जबाबदारी आपल्यावर येईल या विचाराने शाळा व्यवस्थापन सामंजस्य करार करायला तयार होत नाही. सर्वसाधारणपणे रोड टॅक्स म्हणून आम्हाला एका सीटमागे वर्षाला १९०० रूपये भरावे लागतात. मात्र जर शाळांनी सामंजस्य करार केला आणि पत्र दिले तर स्कूलबससाठी हा टॅक्स १०० रूपयेच आकारला जातो. ठाण्यातील २५ पेक्षा अधिक शाळांच्या सुमारे ५०० बस या संघटनेशी संलग्न आहेत. त्यातील सुमारे १५ शाळा करार करतच नाही. त्यामुळे आमचे मात्र आर्थिक नुकसान होते आणि वाहतूक परवडत नसल्याने शुल्कवाढ करावी लागल्याने हा भूर्दंड पालकांनाही सहन करावा लागतो. शाळांनी करार केल्यास आमचा आणि पालकांचाही फायदाच होऊ शकेल. करारानुसार शाळांनी केवळ एक पत्र द्यायचे असते. ज्यामध्ये ही स्कूलबस आमच्या शाळेसाठी चालविली जाते आणि ते आम्हाला मान्य आहे, असे नमूद असते. त्याचबरोबर शाळा भरणे आणि सुटण्याच्यावेळी शाळेसमोर केवळ स्कूलबसना पार्र्किं गची सोय असली पाहिजे.- मनोज पावशे, अध्यक्ष, विद्यार्थी वाहतूक संघटना, ठाणे.ठाणे, भिवंडी, शहापूर, मिरा- भाईंदर हद्दीत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या १००७ बस आणि व्हॅन आहेत. त्यापैकी सुमारे ७०० वाहनांची तपासणी झाली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वाहन तपासणीची मुदत संपली असली तरी आम्ही तपासणी सुरू ठेवून ती पूर्ण करणार आहोत. सुरक्षेच्या दृष्टीने एखादी बाब अपूर्ण असल्यास ती पूर्ण करून वाहन पुन्हा तपासणीसाठी आणण्याच्या सूचना देतो. त्यातच अनेक शाळा बसमालकाशी सामंजस्य करार करायला तयार होत नाही. अनेकदा बैठका घेऊन आम्ही त्यांना तशा सूचना दिल्या. मात्र शाळा सकारात्मक नाहीत. या बाबतीत पालकांनी आता शाळा व्यवस्थापन किंवा मुख्याध्यापकांना भेटून सामंजस्य करार करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे