शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात प्रदूषण घटले ; मात्र वाहनखरेदी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:39 IST

७९,६३२ नवी वाहने : ६५,५१६ दुचाकींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे एकीकडे शहरातील हवा आणि ध्वनिप्रदूषणात घट झाली असली, तरी दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच रेल्वे आजही बंद असल्याने त्यामुळे वाहन खरेदी वाढल्याचे समोर आले आहे. शहरात आजघडीला २२ लाख १७ हजार ६९९ वाहने असून, त्यामध्ये सर्वाधिक दुचाकी आहेत. त्यांची संख्या तब्बल १२ लाख ८२ हजार ६९९ इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७९ हजार ६३२ वाहनांची अधिक भर पडली आहे, तर यंदा नव्याने दुचाकीमध्ये ६५ हजार ५१६ भर पडली आहे.

एकीकडे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू झाले आहे, परंतु अद्यापही वाहनचालक किंवा नागरिक इलेक्ट्रिक वाहनांना अधिकचे महत्त्व देताना दिसत नाही. त्याचीही कारणे तशीच आहेत. चार्जिंग स्टेशनचा मुद्दा असल्याने ती अधिक प्रमाणात खरेदी होताना दिसत नाही. दरम्यान, दुसरीकडे यंदा लॉकडाऊनमुळे हवा, ध्वनिप्रदूषणात कमालीची घट झाली आहेते, परंतु दुसरीकडे आजही रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी खुली झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचा कल खासगी वाहनांकडे अधिक असल्याचे दिसून आले. एसटी किंवा इतर प्राधिकरणांच्या सेवा जरी सुरू असल्या, तरी त्यातूनही काहीशी भीती आजही नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची वाहने वापरुन कामाच्या ठिकाणी जाण्यास अधिक पसंती दिली आहे. त्यामुळेच आता ठाण्यातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढून वाहतूककोंडीतही भर पडली आहे.

ठाण्यात २२ लाख वाहनेआजघडीला ठाण्यात २२ लाख १७ हजार ६९९ वाहने आहेत. मागील वर्षी याच कालावधीत शहरात २१ लाख ३८ हजार ६७ वाहनांची खरेदी झाली होती. यंदा त्यात ७९ हजार ६३२ नव्या वाहनांची भर पडली आहे, तर मागील वर्षी शहरातील रस्त्यांवर १२ लाख १७ हजार १८३ दुचाकी धावत होत्या. यंदा त्यात ६५ हजार ५१६ नव्या दुचाकींची भर पडली असून, आजघडीला १२ लाख ८२ हजार ६९९ दुचाकी धावत असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आली आहे.

रिक्षा, ॲम्ब्युलन्सची संख्या वाढली मागील वर्षी शहरातील रस्त्यांवर १ लाख १८ हजार ४१९ रिक्षा धावत होत्या. यंदा त्यात काहीशी वाढ होऊन शहरात एक लाख २५ हजार ३९ रिक्षा धावत आहेत.मागील वर्षी १,७९५ ॲम्ब्युलन्स होत्या. यंदा त्यातही काहीशी वाढ होऊन आता १,८४२ ॲम्ब्युलन्स झाल्या आहेत. काेराेनामुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात आले.