शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गॅसगळतीप्रकरणी नोबेल इंटरमीडिएट्‌सला उत्पादन बंद करण्याचे दिले आदेश , प्रदूषण मंडळाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 08:31 IST

gas leak case : या घटनेनंतर शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आणि त्यांच्या पथकाने बदलापूर एमआयडीसीत जाऊन नोबेल इंटरमीडिएट्‌स कंपनीची पाहणी केली.

अंबरनाथ : बदलापूर एमआयडीसीतील नोबेल इंटरमीडिएट्‌स कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना गॅसगळती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. याप्रकरणी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.बदलापूर एमआयडीसीतील नोबेल इंटरमीडिएट्‌स कंपनीत सल्फ्युरिक ॲसिड आणि मिथाइल बेंझाइन या दोन रसायनांवर रिॲक्टरमध्ये प्रक्रिया केली जात असताना त्यात सल्फ्युरिक ॲसिड जास्त पडून दाब वाढल्यामुळे रिॲक्टरमधून गॅसची गळती झाली. काही क्षणांतच हा गॅस बदलापूर शहरात पसरल्यामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, असे त्रास सुरू झाले. यानंतर अग्निशमन दलाने तासाभरात ही गळती रोखली.या घटनेनंतर शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आणि त्यांच्या पथकाने बदलापूर एमआयडीसीत जाऊन नोबेल इंटरमीडिएट्‌स कंपनीची पाहणी केली. यावेळी ज्या रसायनांची निर्मिती आणि प्रक्रिया करण्याचे काम सुरू असताना गॅस गळतीचा प्रकार घडला, त्या रसायनांची निर्मिती करण्याची परवानगीच या कंपनीकडे नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे या कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले. अग्निशमन दलाने तासाभरात ही गळती रोखली होती. 

रासायनिक कंपन्यांवर अंकुश ठेवण्याची गरजअंबरनाथ आणि बदलापूर एमआयडीसीत अशाच पद्धतीने अनेक रासायनिक कंपन्या परवानगी नसतानासुद्धा रासायनिक प्रक्रिया करत असून, त्यामुळेच काही दिवसांपूर्वीच अंबरनाथमध्ये रासायनिक प्रदूषणाच्या सलग दोन घटनादेखील समोर आल्या होत्या. त्यामुळे रासायनिक कंपन्यांवर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर