शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मतदान ५ टक्के वाढले

By admin | Updated: February 22, 2017 05:02 IST

ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर

ठाणे, उल्हासनगर : ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर उल्हासनगरात ४७ टक्के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाण्यातील मतदानात पाच टक्के वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र उल्हासनगरात पुन्हा मतदारांच्या निरुत्साहाचेच दर्शन घडले आहे.ठाणे शहरात मतदान शांततेत झाले असले तरी मतदार यादीमधील घोळाचे परिणाम विविध ठिकाणच्या मतदान केंद्रावर दिसून आले. राबोडी, लोकपुरम, कळवा, घोडबंदर, वागळे, किसननगर व इतर भागात हा गोंधळ झाल्याचे दिसून आले. ठाण्यातील राबोडी भागातील सरस्वती विद्यालय या मतदान केंद्रावर गेलेल्या सुमारे दीड हजार मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. महिलांनी तर आक्रमक स्वरूप धारण केले होते. अखेर या ठिकाणी पोलिसांच्या अतिरिक्त तुकडीला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे लोकपुरम भागातही काही मतदारांची नावे यादीतून गहाळ झाली होती. वर्तकनगर भागात मुंब्रा आणि भिवंडीतील मतदार आणून मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप केले गेले. परंतु सतर्कतेमुळे हे बोगस मतदार पकडण्यात आले. पालिकेच्या निवडणूक विभागामार्फत २० फेब्रुवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने, त्यानंतर मतदाराचा क्रमांक बदलला गेला, तसेच मतदानाचे ठिकाणही बदलले गेले. त्यामुळे मतदारांना आधीच मिळालेल्या स्लीप हाती घेऊन मतदार केंद्रापर्यंत पोहोचल्यावर तुमचे मतदान येथे नाही दुसरीकडे बघा असे सांगितले जात असल्याने असंख्य मतदारांचा गोंधळ उडाला. काही ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते हाती पेन घेऊन कोऱ्या स्लीप भरून देण्याचे काम करीत होते.  माजी नगरसेवकाला मारहाण पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक शहाजी जाविर यांना वागळे इस्टेट भागात मारहाण झाली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. किसननगर भागात तर अनिल कुमार यादव नामक मतदाता मतदान करण्यासाठी गेला असता त्याच्या जागी आधीच कोणी तरी मतदान करून मोकळा झाला होता. त्यामुळे या भागातही वातावरण तापल्याचे दिसून आले. मतदानाच्या दिवशीच पैसे वाटणाऱ्या दोघांना चोप देऊन लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)असा वाढला टक्का 1 सकाळच्या सत्रापासून विविध भागांत मतदारांचा चांगलाच प्रतिसाद लाभल्याने सकाळी साडेअकरापर्यंत १०.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक दिसून आला. त्यानंतर पुढील दोन तासांत १९.११ टक्के मतदानाची नोंद झाली. तर पुढील दोन तासांत म्हणजेच दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानात केवळ ९ टक्क्यांचीच वाढ दिसून आली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४५.०५ टक्के मतदानाची नोंद झाली. 2 उल्हासनगरात काही भागात मतदारांच्या तुरळक रांगा लागल्या होत्या. मात्र यादीत नावे नसल्याचे लक्षात येऊ लागल्यावर, तसेच केंद्राबाबतचा घोळ असल्याने काही अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली. पुन्हा साडेतीननंतर मतदारांनी केंद्रांवर रांगा लावल्या. सकाळी साडेनऊपर्यंत ७ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत १२.४३ टक्के, दीड वाजेपर्यंत २४ टक्के, तर साडेचार वाजेपर्यंत ४०.१२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.