शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटवण्यात होणार राजकीय हस्तक्षेप?

By admin | Updated: May 30, 2017 05:35 IST

अंबरनाथ-बदलापूर महामार्गावर शासकीय जागेवर उभारण्यात आलेल्या ४५ अनधिकृत दुकानांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी

अंबरनाथ : अंबरनाथ-बदलापूर महामार्गावर शासकीय जागेवर उभारण्यात आलेल्या ४५ अनधिकृत दुकानांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार, दुकानदारांना नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. ही कारवाई ३० मे रोजी होणार होती. त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तही मागवला होता. मात्र, या कारवाईसाठी बंदोबस्त देण्यास पोलीस प्रशासन चालढकल करीत आहे. दुसरीकडे या दुकानदारांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. एकीकडे पोलीस प्रशासनाचे असहकार्य आणि दुसरीकडे राजकीय हस्तक्षेप यामुळे ही कारवाई अधांतरी राहिली आहे. शासकीय जागेवरील अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते शौकत शेख यांनी शासकीय कार्यालये, मंत्रालय आणि उच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली. या सर्वच विभागांनी कारवाईसंदर्भात आपापल्या परीने आदेशही काढले. न्यायालयाने हे प्रकरण शासनस्तरावर निर्णय घेऊन सोडवण्याचे आदेश दिले होते. मंत्रालयात महसूल विभागानेदेखील या दुकानांना दिलेली स्थगिती उठवली होती. त्यामुळे या दुकानांवरील कारवाई निश्चित मानली जात होती. कारवाईसाठी तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तही मागवला होता. मात्र, दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने दाद मागितल्याने त्यांनी पुन्हा या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने सुनावणी घेतल्यावर ही दुकाने शासकीय जागेवरील अतिक्रमित दुकाने असल्याचे स्पष्ट झाले आणि जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, तहसीलदारांनी ३० मे रोजी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणीदेखील केली. १५ दिवस आधीच पोलीस बंदोबस्त मागवलेला असतानाही या शासकीय कामासाठी पोलीस प्रशासनाने २९ मे रोजी रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त दिला नव्हता. त्यामुळे या कारवाईला मुहूर्त मिळणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारवाई रोखण्यास पालकमंत्र्यांना साकडेदुकानांवरील कारवाई रोखण्यासाठी संबंधित सर्व दुकानदारांनी एकनाथ शिंदे हे अंबरनाथमध्ये आलेले असताना २८ मे रोजी त्यांना निवेदन देऊन कारवाई रोखण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे या दुकानदारांनी नव्याने उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागितली. अद्याप त्याला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मंगळवारी प्रत्यक्षात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.