शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात वारसदारीची फॅशन, नितीन गडकरी यांनी डागली तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:13 IST

माझा मुलगा राजकारणात नाही. तो माझ्या नावाने माझा राजकीय वारसदार बनावा, अशी माझी इच्छा नाही. अलीकडे राजकीय वारसदारीची फॅशनच होत चालली आहे.

मीरा रोड : माझा मुलगा राजकारणात नाही. तो माझ्या नावाने माझा राजकीय वारसदार बनावा, अशी माझी इच्छा नाही. अलीकडे राजकीय वारसदारीची फॅशनच होत चालली आहे. सर्वच नेते बनत आहेत, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय वारसदारीचा समाचार घेतला.भार्इंदरच्या उत्तन येथील केशवसृष्टीतल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत सोमवारी दीक्षान्त समारोह पार पडला. यावेळी गडकरी बोलत होते. या सोहळ्याला खासदार डॉ. नरेंद्र जाधव, खा.डॉ. विनय सहस्रबुद्धे, रेखा महाजन, विजय गिरकर, अरविंद रेगे, रवींद्र साठे, रवी पोखरणा यांच्यासह मीरा-भार्इंदर भाजपाचे आमदार, महापौर, नगरसेवक आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, माझा खरा राजकीय वारसदार हा भाजपा, रा.स्व. संघ असल्याचे सांगत कार्यकर्त्याला पुढे आणले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.समाजातील जे शोषित, पीडित, दलित आहेत, जे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या अशा दरिद्री नारायणांना देव मानून त्यांची निरंतर सेवा करा. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळेल तेव्हा आपलं कार्य पूर्ण होईल. महात्मा गांधी, पं. दीनदयाळ उपाध्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे हेच विचार होते. मनात स्वच्छ भावनेने केलेल्या सेवेसमोर जात, धर्म, प्रांत, भाषेच्या भिंती तुटून पडतात. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा करायला प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.आपली वर्तणूक, काम, ओळख यातून नेतृत्वाचे मूल्यमापन होते. ज्यांना गावात, शहरात कोणी विचारत नाही, असे दिल्लीत नेते बनले आहेत. चांगल्या नेतृत्वासाठी प्रगल्भता, गुणवत्ता, लोकांना भेटणे हे ठीक आहे; पण ज्ञानदेखील महत्त्वाचे आहे. आज हाच विरोधाभास देशात पाहायला मिळतो, तो दूर करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही पक्षात जा. सर्व पक्षांत चांगले नेते झाले, तर लोकशाहीत गुणात्मक सुधारणा येईल. लोकतंत्र मजबूत झाले तर देशाचा विकास होईल, असे ते म्हणाले.म्हणून मी निवडणूक जिंकतोनंगे, उचक्के, लोफर हे माझ्यासोबत असल्याने मी निवडणूक जिंकतो, असे सांगतानाच कॅश, कास्ट व क्रिमिनलवर मात करण्याची ताकद तुमच्यात असून प्रामाणिकपणे काम करा, असा उपदेश नितीन गडकरी यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी