शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘यूएलसी’ प्रकरणी पोलिसांकडून छळ

By admin | Updated: January 25, 2017 04:55 IST

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मीरा भार्इंदरमधील काही विकसकांनी बनावट यूएलसी दाखल्याचा वापर करुन सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक

मीरा रोड : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मीरा भार्इंदरमधील काही विकसकांनी बनावट यूएलसी दाखल्याचा वापर करुन सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली असतानाच मंगळवारी बिल्डरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यूएलसी प्रकरणात पोलिसांकडून छळ होत असल्याने मदतीचे साकडे घातले. विशेष म्हणजे बिल्डरांच्या शिष्टमंडळात अनेक वादग्रस्त तसेच अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांचाही समावेश होता. मीरा भार्इंदरमध्ये बनावट यूएलसी दाखल्याचा आधार घेऊन सरकारला देय असलेल्या पाच टक्के सदनिका काही विकसकांनीच विकून खाल्या आहेत. या प्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करुन एका बनावट यूएलसी दाखल्याप्रकरणी मनोज पुरोहित, श्यामसुंदर अग्रवाल, शैलेश शाह, रतीलाल जैन या चौघा बिल्डरांसह ठाणे जिल्हा यूएलसी कार्यालयातील हंगामी लिपीक बबन पारकर अशा पाच जणांना अटक केली आहे. यात आणखी एक आरोपी असून त्याचा शोध घेत आहेत. आतापर्यंत सरकारची सुमारे दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचे या यूएलसी घोटाळ्यातून समोर आले आहे. शहरातील अनेक विकसकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे मीरा भार्इंदरमधील अनेक संबंधित बिल्डरांचे धाबे दणाणले आहे. उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये कार्यशाळेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. आमदार नरेंद्र मेहता यांनी पुढाकार घेऊन शहरातील बिल्डरांची त्यांच्याशी भेट घालून दिली. या भेटीत बिल्डरांनी यूएलसी प्रकरणी सुरु असलेल्या कारवाईबाबत भीती व्यक्त केली. पोलिसांकडून बिल्डरांचा छळ होत आहे. आम्ही व्यापारी असून त्या पध्दतीने वागणूक दिली जात नाही. यात स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात महापौर गीता जैन, मनसेचे उपाध्यक्ष अरुण कदम, राष्ट्रवादीचे नगरसेवक आसिफ शेख, एमसीएचआयचे मीरा भार्इंदर अध्यक्ष आशित शाह, उपाध्यक्ष दिलीप पोरवाल, जयेश शाह, रामचंद्र वैष्णव, सुरेश काबरा, गौरव पोरवाल यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)