शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

पोलीस बंदोबस्तात झाला भूमिपूजन सोहळा

By admin | Updated: April 19, 2017 00:23 IST

पालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या व अतिक्रमण होऊ नये म्हणून आरएनए मलनिस्सारण केंद्राजवळील जागेच्या सुशोभीकरणास महापालिकेने मंजुरी दिली

मीरा रोड : पालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या व अतिक्रमण होऊ नये म्हणून आरएनए मलनिस्सारण केंद्राजवळील जागेच्या सुशोभीकरणास महापालिकेने मंजुरी दिली असताना दुसरीकडे आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू फेडरेशनने मात्र कामास विरोध केल्याने वाद निर्माण झाला. या वादाला शिवसेना विरुध्द भाजपा असा रंग असल्याची चर्चाही रंगली. अखेर मोठ्या पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यानेच खासदार, आमदार आदींच्या उपस्थितीत भूमिपूजन केले. मीरा रोडच्या आरएनए ब्रॉडवे वसाहतीसह नव्याने झालेल्या आरएनए लिबर्टीजवळ विकासकाने मलनिस्सारण केंद्र बनवले होते. ते नियमित चालवले जात नसल्याने अखेर ते पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. रहिवाशांसह अन्य नागरिकांनीही पालिकेस केंद्र ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने महासभेत ठराव देखील झाला. दरम्यान केंद्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेवर बेकायदा बांधकामे झाली. या अतिक्रमणामागे भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या नावाची चर्चा आहे. या अतिक्रमणा विरोधात महापालिकेने दोन - तीन वेळा कारवाई करत बांधकाम पाडले. तरी देखील काही भागात अतिक्रमण कायम आहे. अतिक्रमण कायमचे हटवून या जागेचे सुशोभीकरण करुन रहिवाशांसाठी मिनी उद्यान बनवण्याची मागणी नगरसेविका वंदना चक्रे यांनी जुलै २०१६ पासून महापालिकेकडे केली होती. अखेर चक्रे यांच्या नगरसेवक निधीतून या ठिकाणी पाच लाख खर्चून कुंपणभिंत, मिनी उद्यान व त्यात बसण्यासाठी बाकडे बसविण्यास पालिकेने मंजुरी दिली. निविदा मंजूर करून केवळ कार्यादेश देणे बाकी असल्याचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी चके्र यांना पत्राद्वारे कळवले. सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी खासदार राजन विचारे व आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होते. परंतु आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू फेडरेशनने या ठिकाणी तारेचे कुंपण टाकून ती जागा आमची असल्याचे फलक लावले. तसेच पोलीस व महापालिकेस पत्र देऊन सुशोभिकरणाच्या कामास विरोध करत व आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, काम व कार्यक्रम रद्द व्हावा म्हणून भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी अधिकाऱ्यास फोन केल्याचे वृत्त आले आणि शिवसेना विरुध्द भाजपा असा सामना रंगला. मेहतांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सजी आयपी यांनी ही जागा रहिवासांच्या मालकीची असून रहिवासी उद्यान विकसित करतील अशी भूमिका घेतली. जागेत प्रवेश व भूमिपूजन केल्यास सर्वांवर गुन्हा दाखल करू असे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता खांबित यांच्या हस्ते भूमिपूजन करायला लावून खासदार विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांनी वाद टाळण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांना विश्वासात घ्या, गैरसमज दूर करून काम सुरु करा अशी भूमिका त्यांनी घेतली. या वेळी माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, उपमहापौर प्रवीण पाटील, नगरसेविका वंदना चक्रे, अरुणा चक्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)