शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका कामगाराच्या मृत्यू, पोलिसांचे भाजपाशी संबंधित बिल्डरला संरक्षण

By धीरज परब | Updated: June 12, 2024 21:04 IST

मीरारोड मध्य भाजपाशी संबंधित विकासक - ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका मजुराचा सुरक्षे अभावी पडून मृत्यू झाला असताना त्यात मीरारोड पोलिसांनी विकासकाला आरोपी करणे टाळले असल्याने टीका होत आहे .

मीरारोड - मीरारोड मध्य भाजपाशी संबंधित विकासक - ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका मजुराचा सुरक्षे अभावी पडून मृत्यू झाला असताना त्यात मीरारोड पोलिसांनी विकासकाला आरोपी करणे टाळले असल्याने टीका होत आहे . ह्या आधी देखील सदर विकासक कम ठेकेदारावर इमारत बांधकाम दरम्यान दोन लहान मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल आहे . 

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे निकटवर्तीय महेंद्र कोठारी हे भाजपाशी संबंधित मानले जातात . महेंद्र आणि कविता कोठारी यांच्या मीरारोडच्या रामदेव पार्क - कनकिया भागातील  के.डी. हर्मिटेज ह्या इमारतीचे काम सुरु आहे .  ७ जून रोजी रोजी राबीबुल केताबुल रहमान ( वय ३० वर्ष ) हा मजूर काम करत असताना सातव्या माळ्यावरुन लिफ्टच्या डक मध्ये पडून  डोक्यास, हाता-पायास मार लागून त्याचा मृत्यू झाला होता . इमारत बांधकाम ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीने हेल्मेट, सेप्टी बेल्ट आदी गरजेचे असताना ते नसल्याने पडून त्याचा मृत्यू झाला प्रकरणी मीरारोड पोलिसांनी हैरुल शेख ह्या ठेकेदारावर ९ जून रोजी गुन्हा दाखल केला. 

माजी आमदार मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अपना घर फेस - ३ च्या इमारत बांधकाम दरम्यान ३ सप्टेंबर २०२२ रोजी जयंतो दास (वय ६ वर्ष ) व सुभो दास ( वय ४ वर्ष ) ह्या दोन लहान बालकांचा डोक्यावर लोखंडी अँगल पडून मृत्यू झाला होता . त्या गुन्ह्यात तत्कालीन काशीमीरा पोलिसांनी ठेकेदार म्हणून महेंद्र कोठारी वर गुन्हा दाखल केला होता . सदर प्रकल्पातच २४ मे २०२४ रोजी मयत डब्लू यादव ( वय २२ वर्ष ) ह्या कामगाराचा पडून पृत्यु झाल्या बद्दल देखील ठेकेदार वर गुन्हा दाखल केला गेला . त्या आधी मुकेश सिंह मार्को ( वय २६ वर्ष ) ह्याचा फेब्रुवारी २०२४ मध्ये अपना घर फेस ३ च्या निर्माणाधीन इमारतीतून पडून मृत्यू झाला होता . परंतु ह्या सलग गुन्ह्यात देखील पोलिसांनी विकासकास आरोपी केले नाहीच शिवाय ३०४ हे कलम देखील जाणीवपूर्वक लावले नाही असे आरोप पोलिसांवर झाले . 

आता त्याच महेंद्र कोठारी यांच्या रामदेव पार्क येथील बांधकाम सुरु असलेल्या  के.डी. हर्मिटेज इमारती वरून पडून आणखी एका मजुराचा मृत्यू झाला आहे . ह्यात देखील मीरारोड पोलिसांनी विकासकास  आरोपी केले नाहीतच शिवाय सतत कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडून देखील कलम ३०४ लावले नाही असा आरोप सामाजिक संस्थांनी केला असून पोलिसांना मजुरांच्या जीवाशी सोयरसुतक नसल्याची टीका त्यांनी केली आहे .