शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सहकाऱ्याच्या पत्नीसाठी पोलिसाचे प्लाझ्मादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:28 IST

उपचारास मदत; कोरोनातून मिळाली मुक्ती

मुंब्रा : शीळ-डायघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दीपक जाधव यांनी त्यांच्या सहकारी पोलीस हवालदाराच्या पत्नीला प्लाझ्मादान केल्यामुळे ती कोरोनामुक्त झाली. त्यांच्या या कृतीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.शीळ-डायघर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली. हे वेळीच निदर्शनास न आल्याने त्याची पत्नीही बाधित झाली. तिची प्रकृती जास्त खालावल्याने प्लाझ्माची आवश्यकता असल्याचे तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी सांगितले. हवालदाराने ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना सांगितली. जाधव तसेच त्यांचे सहकारी प्लाझ्मादान करणाऱ्यांचा तपास करत असतानाच त्यांना दीपक जाधव यांनी कोरोनावर मात केल्याचे तसेच त्यांचा प्लाझ्मा उपचार हवालदाराच्या पत्नीला चालणार असल्याचे समजले. हे कळताच वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून प्लाझ्मादान करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या