शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या तक्रारीनंतर उपनिरीक्षकासह पोलीस नाईकाची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:52 IST

ठाणे : एरवी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय जुमले यांनी आपल्या वाहनांची पीयूसी ...

ठाणे : एरवी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय जुमले यांनी आपल्या वाहनांची पीयूसी आणि विमा संदर्भातील कागदपत्रे अद्ययावत न ठेवल्याने त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत नौपाडा युनिटच्या मच्छिंद्र माळी या पोलीस नाईकला वाहतूक शाखेतून मुख्यालयात हलविले आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेच्या नौपाडा युनिटचे उपनिरीक्षक जुमले यांच्याविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी एका नागरिकाने पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाण्याचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यामध्ये जुमले यांच्या मोटारकार आणि मोटारसायकल या वाहनांचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि विमा ही कागदपत्रे नसल्याचे म्हटले होते. याबाबतची तक्रार राज्य सरकारच्या एमपरिवहन या अ‍ॅपवर दिली होती. त्याचबरोबर महागड्या वस्तू खरेदी करताना जुमले यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का, याचीही विचारणा या नागरिकाने केली होती. याव्यतिरिक्तही जुमले यांच्याविरुद्ध नागरिकांना अरेरावी केल्याच्या तसेच पैसे घेतल्याच्या तक्रारी उपायुक्त कार्यालयात आल्या होत्या. याचीच दखल घेऊन उपायुक्त पाटील यांनी सहायक पोलीस आयुक्तांमार्फत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच त्यांची नौपाडा येथून व्हीआयपी वाहनांवर बदली केली. तसेच, पोलीस नाईक माळी यांचीही यापूर्वी शिक्षा म्हणून अंबरनाथ येथून थेट नौपाडा युनिटमध्ये बदली केली होती. मात्र, त्यांच्याही विरुद्ध अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनाही आता वाहतूक शाखेतून पोलीस मुख्यालयात बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘‘ जुमले यांच्याविरुद्ध अरेरावीसह अनेक तक्रारी होत्या. त्यातच त्यांच्या वाहनांचे पीयूसी आणि विमा नसल्याचीही तक्रार होती. अशा अनेक कारणांमुळे त्यांची बदली केली आहे, तर पोलीस नाईक माळी यांची मात्र वाहतूक शाखेतून मुख्यालयात बदली केली आहे.’’

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर