शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या जॅमरची चोरी

By admin | Updated: May 25, 2016 04:29 IST

नौपाड्यात ‘नो पार्किंग’ क्षेत्रामध्ये अगोदर आपली मोटार उभी करायची... वाहतूक पोलिसांशी टायरला बसवलेला जॅमर काढण्यावरून हुज्जत घालायची... पोलिसांची पाठ वळताच गाडीला लावलेले

ठाणे : नौपाड्यात ‘नो पार्किंग’ क्षेत्रामध्ये अगोदर आपली मोटार उभी करायची... वाहतूक पोलिसांशी टायरला बसवलेला जॅमर काढण्यावरून हुज्जत घालायची... पोलिसांची पाठ वळताच गाडीला लावलेले जॅमर टायरसहित काढून दुसरे टायर बसवून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उर्मट मोटारचालकाविरोधात पोलिसांनीचोरी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना शाखाप्रमुखाने महिला वाहतूक पोलिसाबरोबर असभ्य वर्तन करण्याचे प्रकरण अलीकडेच गाजले असताना ही ताजी घटना घडली आहे. नौपाड्यातील संभाजी मार्गावर ‘एन्जॉय फॅशन’ या दुकानासमोर वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार अनिल शिंदे यांनी नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ‘आयटेन’ कारला २१ मे रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास जॅमर लावले. त्यामुळे मोटारीचा चालक बन्सल हा ‘जॅमर क्यों लगाया’, असा जाब विचारत पोलिसांच्या अंगावर धावून आला. या ठिकाणी ‘नो पार्किंग’चा फलक नसल्याबद्दल त्याने पोलीस निरीक्षक ए.एस. मांगले यांच्याशी हुज्जत घातली. दंडाची रक्कम भरल्यावरच जॅमर काढण्यात येईल, असे मांगले यांनी त्याला बजावले. वाहतूक पोलीस अन्यत्र जाताच बन्सलने जॅमर लावलेले चाक काढून गाडीच्या डिकीत ठेवून त्या ठिकाणी दुसरे चाक लावले. पोलिसांची नजर चुकवून पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच पुन्हा तिथे आलेल्या शिंदेंना त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने शिवीगाळ, धक्काबुक्की केली. पोलिसांच्या अंगावर गाडी घालून निघून जाण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र, त्याची गाडी मांगले यांनी बिट मार्शलच्या मदतीने रोखल्यानंतर तो कार लॉक करून तिथून निघून गेला.त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी जॅमर चोरणे, हल्ला करणे, शिवीगाळ करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची मोटार नौपाडा पोलिसांनी जप्त केली असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलीस आणि प्रवाशांतील संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. उपनिरीक्षक श्रीकांत पवार तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)अंगावर घातले वाहन...विशेष म्हणजे जॅमर लावलेला टायर बदलून हा चालक पळ काढत असल्याचे पाहिल्यावर वाहतूक पोलीस तातडीने आले. त्या वेळी त्याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर, हा चालक चक्क आपली मोटार लॉक करून पसार झाला.चालकाविरुद्ध गुन्हा दाखलबन्सल याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी जॅमर चोरणे, हल्ला करणे, शिवीगाळ करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.