शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मधील रस्ते खोदकामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी प्रकरणी पोलिसांनी दिल्या सूचना

By धीरज परब | Updated: April 18, 2024 20:14 IST

राज्य शासनाच्या तसेच महापालिकेच्या मंजूर निधी मधून शहरातील अनेक लहान मोठे रस्त्यांचे काँक्रीटीकरण हाती घेण्यात आले आहे .

मीरारोड - शासन आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून शहरात सिमेंट रस्ते बांधकामे , सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे आदींसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवण्यात आले असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व रहदारीला अडथळा तसेच पावसाळ्या आधी कामे पूर्ण करणे या बाबत वाहतूक पोलिसांनी बैठक बोलावून ठेकेदारांना अनेक सूचना केल्या आहेत . 

राज्य शासनाच्या तसेच महापालिकेच्या मंजूर निधी मधून शहरातील अनेक लहान मोठे रस्त्यांचे काँक्रीटीकरण हाती घेण्यात आले आहे . त्याच बरोबर सूर्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत शहरातील नवीन मोठ्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे . त्यासाठी सुद्धा रस्ते ठिकठिकाणी खोदले आहेत . 

रस्ते मोठ्या प्रमाणात खोदून कामे करताना त्याठिकाणी महापालिका व ठेकेदार यांच्या कडून मात्र रहदारी आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे केल्या गेलेल्या नाहीत . खोदकाम सुरु आहेत तिकडे रहदारी व वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वॉर्डन नेमलेले नाहीत . खोदकाम ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने अनेक अपघात होत आहेत . शिवाय तोंडावर पावसाळा आला असून खोदकाम आदी त्या आधी पूर्ण करणे आवश्यक आहे . 

शहरातील रस्ते खोदकाम मुळे होत असलेल्या वाहतूक कोंडी आणि पावसाळा पाहता मीरा भाईंदर - वसई विरार उपायुक्त मुख्यालय सुहास बावचे यांनी आढावा बैठक बोलावली होती . या बैठकीला वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विलास सानप , पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे सह रस्ते बांधकाम करणारे ठेकेदार व प्रतिनिधी आदी उपस्थित होते . 

रस्ते खोदकामची कामे ही पावसाळ्या आधी वेळेत पूर्ण करा . उर्वरितकाम हे पावसाळा संपल्यानंतरच सुरु करा . ज्या ठिकाणी कामे चालू आहेत त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी व नागरिकांना रहदारीला अडथळा येऊ नये म्हणून ट्राफिक वार्डन ठेवा.  कामाच्या ठिकाणी बॅरीकेटीग करा . रेडियम पटटी, नाईट ब्लिंकर्स, वाहतूक कोन यांचा वापर करा जेणे करून रात्रीच्या वेळी दुर्घटना होणार नाही आदी सूचना उपायुक्त सुहास बावचे यांनी केल्या आहेत . रहदारी व वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच दुर्घटना घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे .