शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे न बुजविणाऱ्या ठेकेदारांवर पालिका करणार गुन्हे दाखल, स्थायी समितीच्या बैठकीत दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:22 IST

शहरातील जे रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत, ज्यांचे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे, त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे संबधींत ठेकेदाराने न बुजविल्यास त्या ठेकेदांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती नगरअभियंता अनिल पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देखड्यांचा प्रश्न स्थायीत गाजलाठेकेदार आणि पालिका अधिकाºयांत संगणमत

ठाणे - शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचा मुद्दा बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही चांगलाच गाजला. रस्त्यांवर कोट्यावधी खर्च करुनही त्यांना खड्डे कसे पडतात असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केला. डांबरी रस्त्यांसाठी वापरले जाणारे मटेरीअल देखील चुकीचे वापरले जात असल्याचा आरोप यावेळी सदस्य नारायण पवार यांनी केला. त्यामुळे अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशी मागणी देखील त्यांनी केली. परंतु रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा कालावधी निश्चित झाला असून त्या रस्त्यांवर जर खड्डे पडले असतील तर ते बुजविण्याची जबाबदारी ही त्या त्या ठेकेदारांची आहे. त्यांनी जर ते बुजविले नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती नगरर अभियंता अनिल पाटील यांनी दिली.                  दरवर्षी येतो पावसाळा दरवर्षी पडतात रस्त्याला खड्डे अशी म्हणण्याची वेळ आता ठाणेकरांवर आली आहे. खड्डा दुरुस्तीसाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यावधींची तरतूद केली जाते. परंतु दरवर्षी रस्त्यांना खड्डे पडतात आणि दरवर्षी हा निधी ठेकेदारांच्या खिशात जातो. प्रत्यक्षात डांबरी रस्त्यांची बांधणी किंवा उभारणी ज्या तत्वानुसार करणे अपेक्षित आहे, त्या तत्वालाच ठाणे महापालिका तसेच ज्या ठेकेदारांना ही कामे दिली आहेत, त्या ठेकेदारांनी काळे फासल्याचा आरोप नारायण पवार यांनी यावेळी केला. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आणि आयुक्तांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली ही शोकांतीका असल्याची टिकासुध्दा त्यांनी केली. आता रस्त्यावर उतरुन अधिकाºयांचे केवळ फोटोसेशन सुरु असून पुन्हा रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली असून याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नव्या रस्त्यांना देखील खड्डे पडल्याची टिका त्यांनी केली. १५० कोटींच्या रस्त्यांची कामेही पाण्यात केल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदार आणि पालिकेतील अधिकाºयांच्या संगणमतानेच ही कामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. प्रशासन अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.दरम्यान नवीन रस्त्यांना कुठेही खड्डे पडले नसल्याचा दावा नगर अभियंता अनिल पाटील यांनी केला. तर देखभाल दुरुस्तीसाठी जे रस्ते तयार आहेत, त्या रस्त्यांना खड्डे पडले आणि ते जर बुजविले गेले नाही तर संबधींत ठेकेदांराच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. परंतु पाऊस असल्याने खड्डे बुजविल्यानंतरही खड्डे पुन्हा पडू शकतात अशी शंकासुध्दा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त