शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेंडोन्सांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: July 29, 2016 00:46 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील कोट्यवधी रुपयांची १०८ एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील कोट्यवधी रुपयांची १०८ एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांना गुरुवारी ठाणे न्यायालयाने ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. फसवणुकीप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनीही त्यांचा ताबा मिळावा, म्हणून तयारी सुरू केल्याने, त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अटकेतील केरसी गार्ड, अशोक हिरे, जी.पी. पाल आणि गिल्बर्ट मेंडोन्सा, तसेच अटक नसलेल्या पिलू परवेझ मेहता यांनी आपसात संगनमताने खोटी कागदपत्रे बनवली. यामध्ये पिलू परवेझ मेहता या महिलेच्या कागदपत्रांत फेरफार करून, तिचे नाव पिलूधन मेस्त्री असल्याचे दाखवून, मुंबई उच्च न्यायालय, ठाणे दिवाणी न्यायालय आणि ठाणे तहसीलदार यांची दिशाभूल केली आणि हा गैरव्यवहार केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही हेराफेरी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यू स्वामी समर्थ कंपनीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, मेहता यांनी जमीन आपलीच असून, ती विकण्यासाठी अडथळे आणले जात असल्याचा दावा करून, उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, कासारवडवली पोलिसांनी केलेल्या चौकशीत पिलू परवेझ मेहता, त्यांचा भाऊ केरसी गार्ड, गिल्बर्ट मेंडोन्सा, त्याचा साथीदार हिरे आणि अ‍ॅड. लाल यांनी बोगस कागदपत्रे तयार करून जमीन बळकावण्याचा घाट घातल्याचे उघडकीस आल्याने, या प्रकरणी फेब्रुवारी २०१६ मध्ये मेंडोन्सा यांच्यासह पाचही जणांच्या विरोधात कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी फेब्रुवारी ते मे २०१६ दरम्यान केरसी गार्ड, अशोक हिरे आणि जी.बी. लाल यांना अटक केली. याच दरम्यान, मेंडोन्सा यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज या पूर्वी न्यायालयाने फेटाळला होता. नव्याने केलेला अर्जही ठाणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर, पोलिसांनी त्यांना बुधवारी अटक केली. (प्रतिनिधी) - मेंडोन्सा यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर, या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी याचा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यांना ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने, चौकशीसाठी ताबा मिळावा, म्हणून त्यांनीही तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.