शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय कुलकर्णीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 04:52 IST

बंदी असलेल्या शस्त्रांची विक्री करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता व भाजपाचा डोंबिवली पूर्वेचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवार, २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण : बंदी असलेल्या शस्त्रांची विक्री करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता व भाजपाचा डोंबिवली पूर्वेचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवार, २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.कुलकर्णीने आपल्या ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ या दुकानात बंदी असलेल्या शस्त्रांचा साठा विक्रीस ठेवला होता. याप्रकरणी त्याला १४ जानेवारीला रात्री कल्याण गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर, त्याला १५ तारखेला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पोलिसांना कुलकर्णीकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्याबाबत चौकशी करता आली नव्हती. परिणामी, चौकशीसाठी कुलकर्णीला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी सरकारी वकिलामार्फत पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली.यावेळी, कुलकर्णी याने ही शस्त्रे कशासाठी आणली, कुठून आणली, तसेच यात त्याच्यासह अजून कोणाचा सहभाग आहे का? याबाबतचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील योगेंद्र पाटील यांनी न्यायालयात सांगितले. तर, कुलकर्णीचे दुकान असून व्यवसायासाठीच त्याने ही शस्त्रे आणली होती, अशी बाजू त्याच्या वकिलाने मांडली. त्यावर, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. डी.एस. हातरोटे यांनी कुलकर्णीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे त्याचा ताबा कल्याण गुन्हे शाखेने घेतला आहे.>दुकानात ठेवला होता साठाकुलकर्णी याचे पूर्वेतील मानपाडा रोडवरील महावीरनगरातील अरिहंत इमारतीमध्ये ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ हे दुकान आहे. त्यात त्याने बंदी असलेल्या शस्त्रांचा साठा विक्रीस ठेवला होता. याप्रकरणी त्याला १४ जानेवारीला रात्री कल्याण गुन्हे शाखेने अटक केली..