शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचे पोलिस आयुक्त हाजीर हो... रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 08:32 IST

ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी  पोलिस निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी असमाधान व्यक्त केले आहे. ठाणे पोलिस आयुक्तांनी मंगळवारी महिला आयाेगाच्या कार्यालयात हजर राहून स्वत: अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

ठाण्यात  रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेत महिला आयोगाने पोलिस आयुक्तांना तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कासारवडवली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी अहवाल सादर केला. अहवालात दोन अज्ञात महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करून न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालावर आयोगाकडून असमाधान व्यक्त करण्यात आले.

रोशनी शिंदे यांच्या कार्यालयात घुसलेल्या जमावातील लोक व तेथे झालेला वाद माध्यमांनी प्रसारित केलेल्या चित्रफितींमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत आयोग असमाधानी आहे, असे नमूद करीत पोलिस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेcommissionerआयुक्त