शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणविरहित ठाण्यासाठी पोलिसांची सायकलस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:39 IST

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, वाहतूक कोंडीवर नियंत्रण यावे तसेच आरोग्य तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर केल्यास अनेक फायदे होऊ शकतात.

जितेंद्र कालेकर ठाणे : वाढत्या वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकलचा अधिकाधिक वापर होणे अपेक्षित आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी ठाण्यातील काही तरुण मंडळींसह नुकतीच ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) अशी सायकल सफर केली.

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, वाहतूक कोंडीवर नियंत्रण यावे तसेच आरोग्य तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर केल्यास अनेक फायदे होऊ शकतात. हा सकारात्मक विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी आपण स्वत:पासून काहीशी सुरुवात करावी, या संकल्पनेतून जाधव यांच्यासह ठाण्यातील होतकरू ब्लॉकबस्टर सायकल ग्रुपमधील संदेश राव, साजिद खाकीयनी, पवन मेमन, अनुराग नाईक, संजय मिश्रा, चिराग शहा, अजय सिंग, सचिन चौधरी आणि दिग्विजय गर्जे यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधत २ जूनला पहाटे ५.३० वाजता तीन हात नाका ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट्स हे ४७ किलो मीटरचे अंतर दोन तासांनी सकाळी ७.३० वाजता पार केले.

पर्यावरण संरक्षण, वाहतूक कोंडी टाळणे, व्यक्तिगत स्वास्थ राखणे, असे उद्देश यामागे असल्याचे जाधव यांनी सांगितले. सायकल रॅलीतून एक वेगळे समाधान मिळाल्याचेही खाकीयनी म्हणाले.