शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय देयक मंजुरीसाठी पोलिसाकडूनच लाच मागणाऱ्या पोलिसाला अटक 

By धीरज परब | Updated: May 9, 2023 21:35 IST

मीरारोड - मीरा भाईंदर , वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दोघा पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्याकडून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम ...

मीरारोड - मीरा भाईंदर , वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दोघा पोलिसांनी एका पोलीस कर्मचाऱ्याकडून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम आणि वैद्यकीय देयक मंजुरीसाठी दिड हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एका पोलिसाला अटक करण्यात आली आहे. 

पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक संजय पवार ( ४६ ) व लिपिक गणेश वाघेरे (३२) ह्या दोघांकडे पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन फरक रक्कम, वैद्यकीय देयक आदीचे प्रस्ताव तयार करून ते कोषागार कार्यालयात सादर केली जातात. एका पोलीस कर्मचाऱ्याने या दोघां कडे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणे करिता तसेच वैद्यकीय बिल मंजुरीकरिता अर्ज देऊन पाठपुरावा चालवला होता. 

मात्र पवार आणि वाघेरे ह्या दोघं पोलिसांनी त्या अर्जदार पोलीस कर्मचाऱ्याकडे देयक  कार्यालयात सादर करण्याकरिता दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केली होती. पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे व अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले. 

लाचेची मागणी केल्याचे आढळून आल्याने पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास सह अमित चव्हाण, सखाराम दोडे यांच्या पथकाने मंगळवारी पोलीस आयुक्तालयातून वाघेरे ह्याला अटक केली. तर पवार याचा शोध पोलीस घेत आहेत . या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण