शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

विषारी भाज्यांनी लोकांचे आरोग्य आले धोक्यात

By admin | Updated: January 11, 2017 07:08 IST

डोंबिवली परिसरात रेल्वेमार्गालगत पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांसाठी नाल्यात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी वापरले जात आहे.

डोंबिवली : डोंबिवली परिसरात रेल्वेमार्गालगत पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांसाठी नाल्यात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी वापरले जात आहे. या भाज्या ताज्या म्हणून मिळत असल्या, तरी त्या मानवी आरोग्यास सर्वाधिक हानीकारक आहेत. त्या पिकविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केला आहे. यातील काही भाज्या पालिकेच्या हद्दीत तर काही रेल्वेच्या हद्दीत पिकवल्या जातात. त्यासाठी भाडेपट्ट्याने भूखंड दिले आहेत. मात्र त्यानंतर तेथे पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. पालिका, रेल्वे त्याबाबत परस्परांकडे बोट दाखवते, असा आरोप मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केला. कृषी विभागानेही त्याबाबत काहीही कारवाई केलेली नाही. याविरोधात पक्षातर्फे गेली पाच वर्षे दरवर्षी आंदोलन केले जाते. या विषारी भाज्यांची शेती उखडून टाकली जाते. एक दिवसाचे आंदोलन होते. त्यामुळे त्यावर स्टंटबाजीची टीका केली जाते. हा मुद्दा जनहिताचा आहे, या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले जात नाही. इतर राजकीय पक्षही त्यासाठी पुढे येत नाहीत, अशी खंत मांडली. भाज्या पिकविणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी कोणतीही सरकारी यंत्रणा पुढे येत नाही. त्यांची कारवाईची इच्छा दिसत नाही. रेल्वेमार्गालगतच्या जागा रेल्वेने काही शेतकऱ्यांना भाडे तत्वावर दिल्या आहेत. या शेतीला बाजाराधिष्ठीत शेती असे संंबोधले जाते. पण त्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. रेल्वे ज्या शेतकऱ्याना ही जागा भाडे तत्वावर देते. ते स्वत: भाजीपाला न पिकविता परप्रांतीयांना भाड्याने देतात. ती मंडळी नाल्यातून पंपाद्वारे पाणी उचलून प्रदूषित सांडपाण्यावर भाजीपाला पिकवतात. तोच बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. त्या भाज्या खाणाऱ्यांना अनेक आजार होतात. ते आजार जीवघेणे असतात. त्याकडे डोळेझाक केली जाते, असे म्हणणे त्यांनी मांडले. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरासमोर रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते खंबाळपाडा नाल्यात सोडले जाते. ते ठाकुर्लीनजीक रेल्वेमार्गाखालून कल्याण खाडीत जाते. याच नाल्यातील पाणी भाजीपाला शेतीसाठी वापरले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. विषारी भाज्या पिकविणाऱ्या ंविरोधात कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयात धाव घेतली. मंडळाच्या अधिकारी वर्गाला जाब विचारला असता त्यांनी हा प्रश्न आमच्या कार्यकक्षेत येत नाही, असे सांगितले. त्यामुळे कदम यांनी त्यांचा मोर्चा कल्याण कृषी अधिकाऱ्यांकडे वळविला. (प्रतिनिधी)