शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवलीत नारळांच्या झाडांवर विषप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 02:40 IST

वृक्ष प्राधिकरणाचे दुर्लक्ष : चार झाडांवर विषप्रयोग

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील राजेंद्रनगरातील ओम साई सोसायटी येथील चार नारळांच्या झाडांवर विषप्रयोग झाला असून, झाडे सुकत चालली आहेत. झाडांच्या खोडाला ड्रिल करून, त्यात रासायनिक पदार्थ टाकून विषप्रयोग झाल्याची तक्रार कस्तुरबा पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणात कित्येक दिवस उलटूनही वृक्ष प्राधिकरण किंवा उद्यान विभागाने दखल न घेतल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

२५ डिसेंबर, २०१८च्या सायंकाळी तीन अज्ञात माणसे आली होती. जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी आलो आहोत, असे त्या अज्ञात लोकांनी सांगितले. या वेळी त्यांनी आमच्या घरातून ड्रिल मशिनसाठी लागणारी वीज घेतली. त्यानंतर, झाडांना ड्रिल करायला सुरुवात केली. दरम्यान, ते तिघेही काही तरी चुकीचे करत असल्याचा संशय आला. त्यातली एक व्यक्ती चहूबाजूने नजर ठेवत होती. सायंकाळची वेळ झाल्यामुळे घराबाहेरची लाइट लावली. तेव्हा लाइट बंद करण्यासाठी तिघांतल्या एका व्यक्तीने सांगितले. त्याच्याकडे पिवळ्या रंगाचे रसायन होते. ते रसायन नारळाच्या झाडांच्या मुळाजवळ टाकत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितली.

म्हाडाच्या भूखंडावर अशोक, आंबा, नारळ इत्यादी जुनी झाडे आहेत. याबाबत माजी नगरसेविका शिल्पा चोगले यांनी २६ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्रनगर येथील चार नारळ झाडांच्या मुळावर विषप्रयोग करण्यात आल्याची तक्रार नोंदविली आहे. शिल्पा चोगले या संदर्भात सांगतात की, महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेकडून तपास करण्यात दिरंगाई होत आहेत. झाडे अर्धी मेलेल्या स्थितीमध्ये आहेत. जमिनीचा सर्व्हे करण्याचे कारण देऊन तिघांनी झाडांवर ड्रिल मशिनने छिद्र पाडून विषप्रयोग केला आहे. संबंधित व्यक्तिवर कारवाई झाली पाहिजे.‘झाडे बचाव’ आंदोलनसरकारने पर्यावरण संरक्षणासाठी इतके कायदे व नियम तयार केले असून, राजेंद्रनगर येथील झाडांवर झालेल्या विष प्रयोगवर अद्याप महापालिका, पोलीस आणि उद्यान प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही. गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही, तर झाडांच्या हत्येचे सत्र काही थांबणार नाही. यासाठी सोमवारी, १० वाजता राजेंद्रनगर येथे झाडे बचाव आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी दिली.

टॅग्स :Mumbaiमुंबईthaneठाणे