शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी बँकेचा वसुलीसाठी इमारत जप्त करण्याचा इशारा; रहिवासी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 03:16 IST

लक्ष्मीचंद छेडा यांना १३९ कोटी वसुलीसाठी नोटीस

नारायण जाधवठाणे : मोठमोठ्या विकासक आणि उद्योजकांना नियमबाह्यरीत्या कोट्यवधींची कर्जे दिल्याने हजारो कोटींनी डबघाईस आलेल्या पंजाब ॲण्ड महाराष्ट्र बँक अर्थात पीएमसी बँकेने आता कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी मुसक्या आवळल्या आहेत. याअंतर्गत नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीचंद छेडा आणि कुटुंबीयांना १३९ कोटी चार लाख २० हजार ६३५ रुपयांच्या वसुलीसाठी नोटीस बजावली आहे.

दोन महिन्यांत सदरची कर्जफेड केली नाही, तर त्यांच्या सुदृढ कन्स्ट्रक्शन्सने बेलापूर येथे बांधलेल्या सोसायटीतील सर्व इमारती जप्त करण्याचा इशारा दिला आहे. सुदृढ कन्स्ट्रक्शन्सने बेलापूर सेक्टर १५ येथे भूखंड क्रमांक २८ वर बद्रीनाथ, केदारनाथ, हृषीकेश, सह्याद्री, लेण्याद्री या इमारतींची सोसायटी बांधून त्यातील सदनिका विकल्या आहेत. हा भूखंड तारण ठेवून लक्ष्मीचंद छेडा आणि कुटुंबीयांनी सुदृढ कन्स्ट्रक्शन्सच्या नावे पंजाब ॲण्ड महाराष्ट्र बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले आहे. मात्र, विहित मुदतीत त्याची परतफेड न केल्याने व्याजासह कर्जाची रक्कम १३९ कोटी चार लाख २० हजार ६३५ रुपयांच्या घरात गेली आहे. त्याच्याच वसुलीसाठी बँकेने लक्ष्मीचंद छेडा यांच्यासह हन्सा लक्ष्मीचंद छेडा, रुचिक लक्ष्मीचंद छेडा, निमित लक्ष्मीचंद छेडा यांना २७ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस बजावून हे कर्ज न फेडल्यास ठाणे कोर्टात दावा दाखल करून उपरोक्त सोसायटीतील सर्व इमारती जप्त करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे या पाच इमारतींत घरे घेणाऱ्या १००च्या आसपास सदनिकाधारकांचे धाबे दणाणले असून बँकेच्या नोटिसीमुळे ते हवालदिल झाले आहेत.

घोटाळ्यावर घोटाळेलक्ष्मीचंद छेडा आणि कुटुंबीयांनी हे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतलेले असताना त्यांच्या उपरोक्त सोसायट्यांमध्ये सदनिका घेणाऱ्या १००च्या आसपास रहिवाशांनीही घर घेण्यासाठी विविध बँकांकडून कर्ज घेतल्याची चर्चा आहे. म्हणजे जो भूखंड आधीच तारण आहे, त्यावरील इमारतींमधील घरांसाठीही काही बँकांनी कर्ज दिल्याने या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढू शकते. विशेष म्हणजे यासाठी सिडकोची एनओसीही घेतली नसल्याचे सांगण्यात येते. 

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँक