शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीवर उभारलेली चाळ जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:31 IST

कौसा येथील वनजमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेली चाळ वन कर्मचाऱ्यांनी जमिनदोस्त केली. चाळीतील काही खोल्यांची भूखंड माफियांनी अवैध विक्रीही केली होती.

ठाणे - कौसा येथील वनजमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेली चाळ वन कर्मचाऱ्यांनी जमिनदोस्त केली. चाळीतील काही खोल्यांची भूखंड माफियांनी अवैध विक्रीही केली होती.कौसा येथील डोंगरालगतच्या वनजमिनीवर भूखंड माफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शासनाची जमीन बळकावून अवैध बांधकामे करायची आणि गोरगरिबांना ती विकण्याचा गोरखधंदा भूखंड माफिया करतात. या भूखंड माफियांनी कौसातील वनजमिनीवर आठ दिवसांपूर्वी १३ खोल्यांची चाळ उभारली. मध्यंतरी २८ एप्रिल ते १ मेपर्यंत सलग चार दिवस सार्वजनिक सुटी होती. या काळात भूखंड माफियांनी वनजमिन बळकावून चाळीचे बांधकाम सुरू केले. रात्रीच्या वेळी बांधकाम करून भूखंड माफियांनी तळमजल्यावर सात आणि पहिल्या मजल्यावर सहा खोल्या बांधल्या. १३ पैकी एक-दोन खोल्या वगळल्या तर उर्वरित सर्व खोल्या अतिक्रमकांनी गोरगरिबांना विकल्या होत्या. त्यांची विक्री प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपयांना करण्यात आली होती. त्या ज्यांनी विकत घेतल्या त्यांनी त्यांचे साहित्य खोल्यांमध्ये आणण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी वन कर्मचाºयांना त्याचा सुगावा लागला.अतिक्रमण हटविण्यासाठी उपवनसंरक्षक रामगावकर, सहायक वनसंरक्षक संजय लचके यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने हालचाली करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकासह मुंब्रा पोलिसांनीही तातडीने पुढाकार घेऊन चाळ जमिनदोस्त केली. अतिक्रमण जमिनदोस्त करण्यापूर्वी पथकाने लोकांना त्यांचे साहित्य खोल्यांमधून काढण्यास थोडा अवधी दिला. वनअधिकारी डी.सी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रवीण आव्हाड, वनपाल अर्जुन निचिते, प्रभाकर कुडाळकर, नारायण भंगारे आदींनी ही कारवाई केली.२५0 झोपड्या हटविल्यादिघा परिसरातील इलठाण पाड्यामध्ये वन अधिकाºयांनी ३ मे रोजी कारवाई करून तब्बल २५0 झोपड्यांचे अतिक्रमण हटविले. या भागातील वनजमिनीवर भूखंड माफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या