शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेअर रिक्षांकडून सर्वत्रच प्रवाशांची लूटमार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 01:12 IST

रामनगर येथील स्टॅण्डवरून राजाजी पथ, म्हात्रेनगर, तुकारामनगर येथे शेअर पद्धतीने जाण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी अधिकृत आठ रुपये भाडे आहे.

अनिकेत घमंडीडोंबिवली : केळकर रिक्षास्टॅण्डवरच नव्हे तर रामनगर येथील स्टॅण्डवरून राजाजी पथ, म्हात्रेनगर, तुकारामनगर येथे शेअर पद्धतीने जाण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी अधिकृत आठ रुपये भाडे आहे. मात्र, आरटीओ नियमांची पायमल्ली करून सर्रास १० रुपये आकारले जात आहेत. ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला’ या प्रवासी संघटनेचे सदस्य प्रसाद आपटे यांनी त्यासंदर्भात स्टिंग आॅपरेशन करून थेट व्हिडीओ व्हायरल केला. यानंतरही आरटीओ अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.‘हॅलो ठाणे’मध्ये रविवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी शहरातील अन्य स्टॅण्डवर सुरू असलेली लूट उघड करण्यासाठी स्टिंग आॅपरेशन केले. रामनगर येथे चार रिक्षाचालकांना राजाजी पथ, म्हात्रेनगर येथे जाण्यासाठी किती भाडे द्यायचे अशी त्यांनी विचारणा केली. त्यातील एका रिक्षाचालकाने आठ रुपये भाडे आहे, मात्र दहा रुपये घेत असल्याचे सांगितले. इतर रिक्षाचालकांनी दहाच रुपये भाडे असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वच ठिकाणी प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट होत असल्याचे निदर्शनास आले. आरटीओकडून कारवाई होत नसल्यामुळेच प्रवाशांना दोन रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत असून दिवसभरात हजारो रुपये उकळले जात आहेत.आरटीओने ठिकठिकाणी फलक लावून पहिल्या टप्प्याचे ८ रुपये भाडे असल्याचे नमूद केले आहे. पण, तरीही प्रवाशांकडून थेट १० रुपये आकारले जात असल्याची गंभीर बाब सातत्याने निदर्शनास येत आहे. याबाबत आरटीओने पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवालातर्फे सोशल मीडियावरील व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर काही रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराची खुली चर्चा झाली.आरटीओ अधिकाऱ्यांना यासंदर्भात प्रवाशांनीच तक्रारी कराव्यात, असेही जाहीर आवाहन गु्रपद्वारे करण्यात आले. प्रवाशांनी सुटे आठ रुपये द्यावेत. १० रुपये दिल्यास दोन रुपयांची विचारणा केली तर काही रिक्षाचालक ते परत देतात, पण विचारलेच नाही तर पैसे परत मिळत नाहीत, असे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनीच सुटे आठ रुपये द्यावेत, असे आवाहन रिक्षा युनियनच्या पदाधिकाºयांनी केले. तसेच जे जास्त भाडे नियमबाह्य आकारतात, त्यांची तत्काळ आरटीओ, ट्रॅफिक पोलिसांना तक्रार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.>अखेर तो नियमबाह्य बोर्ड काढलाकेळकर रस्त्यावरील रिक्षास्टॅण्डवर आरटीओच्या परवानगीशिवाय शेअर पद्धतीने पहिल्या टप्प्यासाठी १० रुपये आकारण्यात येणार असल्याचा शनिवारी बोर्ड लावण्यात आला होता. त्यानुसार ‘डोंबिवलीकरांची लूट’ या मथळ्याखाली ‘हॅलो ठाणे’मध्ये रविवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी रविवारी तातडीने संबंधितांना सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी त्या ठिकाणचा नियबाह्य बोर्ड काढल्याचे ससाणे यांनी सांगितले. बोर्ड काढल्यानंतरही तेथील काही रिक्षाचालक १० रुपयेच भाडे घेत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली का? यावर त्यांनी कारवाई करण्यासाठी पथक जाणार असल्याचे सांगितले.